शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांनी लोकांना परत का पाठवण्यासाठी सैन्याची विमाने का वापरली? एका प्रवाशामागे तासासाठी लागले २५ लाख रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 23:56 IST

1 / 8
बेकायदेशीरपणे देशात घुसलेल्या १०४ भारतीयांना बुधवारी अमेरिकेने परत पाठवले. अमेरिकन लष्कराच्या C-१७ ग्लोबमास्टर या विमानाने भारतीय घुसखोराना पंजाबमधील अमृतसर येथे आणण्यात गेले. टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून हे विमान भारतासाठी रवाना झाले होते.
2 / 8
अमेरिकेने इतर देशांतील स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी लष्करी विमानांचाही वापर केला आहे. या विमानांच्या वापरावर मोठा खर्च करण्यात आला आहे. नागरी आणि लष्करी विमानांच्या किमतीची तुलना केली तर अमेरिकन लष्करी विमानांची किंमत कितीतरी जास्त आहे.
3 / 8
ग्वाटेमालामधील घुसखोराना लष्करी विमानाने परत पाठवण्यात आले होता. या प्रक्रियेसाठी प्रति व्यक्ती अंदाजे ४,१०,००० रुपये खर्च आला होता. साध्या विमानांच्या किमतीपेक्षा ही किंमत पाच पट जास्त होती.
4 / 8
२०२३ मध्ये यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंटचे कार्यकारी संचालक टाय जॉन्सन यांनी तिथल्या संसदेत विमान खर्चाबाबत माहिती दिली होती. नागरी विमानाने १३५ स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी प्रति तास सुमारे सुमारे 15 लाख रुपये खर्च आला होता. जर प्रवास किमान पाच तासांचा असेल तर हा खर्च सुमारे ७५ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.
5 / 8
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जर या प्रक्रियेसाठी अमेरिकन आर्मीचे C-17 ग्लोबमास्टर विमान वापरले गेले, तर प्रवासाची किंमत प्रत्येक तासाला सुमारे २५ लाख रुपये आहे. म्हणजेच पाच तासांच्या प्रवासासाठी लष्करी विमानाची किंमत अंदाजे १ कोटी २५ लाख रुपये आहे.
6 / 8
अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना ज्या देशांमध्ये परत पाठवले गेले, त्यापैकी आतापर्यंत भारताचा मार्ग सर्वात लांब होता. भारतापूर्वी बेकायदेशीर स्थलांतरितांना सोडण्यासाठी अमेरिकन लष्कराची विमाने ग्वाटेमाला, पेरू, होंडुरास आणि इक्वाडोर येथे गेली होती.
7 / 8
यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा एक हेतू आहे. डोनाल्ड ट्रम्प हे बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या देशात लष्करी विमानात पाठवून जगाला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत.
8 / 8
रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, 'इतिहासात पहिल्यांदाच आमचे सरकार बेकायदेशीर स्थलांतरितांना लष्करी विमानात बसवून त्यांच्या देशात परत पाठवत आहे. वर्षानुवर्षे आम्हाला मूर्ख समजून हसणारे लोक आता पुन्हा आमचा आदर करतील.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारत