व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या रडारवर कोण? ट्रम्प यांनी ‘या’ देशाचं नाव घेत दिले स्पष्ट संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:43 IST
1 / 5 व्हेनेझुएलामध्ये यशस्वी लष्करी मोहीम राबवून अमेरिकन सैन्याने राष्ट्रपती निकोलस माडुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पश्चिम गोलार्धातील देशांबाबत अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत. तसेच व्हेनेझुएलानंतर आता आपल्या रडारवर असलेल्या पुढच्या देशाचं नावही डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचक विधानांमधून जाहीर करून टाकलं आहे. 2 / 5व्हेनेझुएलानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर असणारा पुढचा देश आहे तो म्हणजे ग्रीनलँड. डोनाल्ड ट्रम्प यांनी डेन्मार्कच्या अधिपत्याखाली असलेल्या ग्रीनलँडवर अमेरिकेचं नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सध्या ग्रीनलँड अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तिथे रशिया आणि चिनी जहाजांच्या हालचाली वाढत आहेत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. 3 / 5डेन्मार्क ग्रीनलँडचं संरक्षण व्यवस्थितपणे करण्यास असमर्थ ठरत आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ग्रीनलँड रणनीतिक दृष्ट्या एवढं महत्त्वाचं आहे की, अमेरिका त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. 4 / 5याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियालासुद्धा सक्त ताकीद दिली आहे. कोलंबिया जागतिक कोकेनच्या कारभारात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. तसेच परिस्थिती बदलली नाही तर अमेरिका लष्करी कारवाईचा विचारही करू शकते, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच सध्या क्युबामधील साम्यवादी सरकार अडचणीत सापडलेलं आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे. त्यामुळे क्युबामध्येही अमेरिकेकडून दबाव वाढवला जाऊ शकतो. 5 / 5दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या मंत्र्यांकडून करण्यात येत असलेल्या विधानांमुळे अमेरिकेचे मित्र आणि विरोधक अशा दोन्हीकडच्या देशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेचं पुढचं लक्ष्य कोण होणार याबाबत चर्चा सुरू असताताच डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडचं नाव घेतल्याने आता अमेरिकेचं पुढचं लक्ष्य काय असेल, याबबत बऱ्यापैकी स्पष्ट होताना दिसत आहे.