शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारतानं एअरस्पेस बंद केल्याने पाकिस्तानला मोठा फटका; 'या' देशांमध्ये जाण्यासाठी लागणार आणखी वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 12:24 IST

1 / 8
भारताने ३० एप्रिल रोजी भारताने २३ मे पर्यंत पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. भारतीय हवाई हद्दीतून पाकिस्तानी विमाने कोणत्या देशांमध्ये जातात आणि भारतीय हवाई हद्द बंद झाल्यामुळे पाकिस्तानचे किती आर्थिक नुकसान होऊ शकते जाणून घेऊया....
2 / 8
पाकिस्तानच्या भौगोलिक स्थानामुळे ते आग्नेय आशिया, पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियासारख्या प्रदेशांसाठी एक महत्त्वाचा हवाई मार्ग आहे. पाकिस्तानी विमाने, विशेषतः पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) आणि इतर खाजगी उड्डाणे, अनेक देशांमध्ये प्रवास करण्यासाठी भारतीय हवाई हद्दीचा वापर करतात.
3 / 8
बांग्लादेश - कराची किंवा इस्लामाबादहून ढाका येण्यासाठी पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्दीतून जातात. हा मार्ग सर्वात लहान आहे आणि कमी इंधन वापरतो. भारतावरून उड्डाण करताना विमानाचा कालावधी अंदाजे २.५ ते ३ तासांचा असतो.
4 / 8
मलेशिया (क्वालालांपूर), थायलंड (बँकॉक), सिंगापूर आणि व्हिएतनाम सारख्या देशांना जाणारी विमाने भारतीय हवाई हद्दीतून जातात. पीआयएच्या लाहोर-क्वालालंपूर विमानाने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करत होती.
5 / 8
पाकिस्तानी विमाने चीन (बीजिंग, शांघाय), जपान (टोकियो) आणि दक्षिण कोरिया (सोल) सारख्या ठिकाणी जाण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करतात. भारताचे उत्तरेकडील हवाई क्षेत्र या उड्डाणांसाठी वेळ आणि इंधन वाचवणारा मार्ग आहे.
6 / 8
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसाठी थेट उड्डाणे कमी असली तरी या देशांमध्ये जाणारी काही चार्टर्ड किंवा मालवाहू विमाने भारतीय हवाई हद्दीतून जातात ज्यामुळे अंतर कमी होते.
7 / 8
अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान सारख्या देशांना जाणारी विमाने देखील भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करू शकतात, जरी हा मार्ग फारसा सामान्य नाही.
8 / 8
या ठिकाणांसाठी भारताचे हवाई क्षेत्र महत्त्वाचे आहे कारण ते केवळ अंतर कमी करत नाही तर इंधन आणि प्रवास खर्च देखील कमी करते. भारताशिवाय, पाकिस्तानी विमानांना लांब पर्यायी मार्गांनी जावे लागते.
टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतairplaneविमान