पाण्यात रस्ता आला कुठून, त्यातही रेल्वे? व्हायरल झालेल्या फोटोची स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 21:04 IST
1 / 8जर्मनीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. शेती पिकांसह नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. 2 / 8येथील फ्रँकफर्ट शहराजवळील २० किमी परिसर जलमय झाला असून आजुबाजूला पाणीच पाणी झालं आहे. 3 / 8मुसळधार पाऊस आणि बर्फ वितळल्यामुळे येथील हाईन नदीला पूर आला असून पुराचे पाणी शहरात शिरल्याचं दिसून येत आहे.4 / 8या पुराचे पाणी प्रँकफर्टजवळच्या निदेराऊ-इचेन भागात शिरले आहे. त्यामुळे, येथील अनेक मैदान, शेती आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. 5 / 8पुराच्या पाण्याने वेढलेल्या रुळावरुन चाललेल्या रेल्वेचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे. रस्ता, रेल्वे ट्रॅक आणि पाणी यांचा तिहेरी संगम व तेथूनच धावणारी रेल्वे हे दृश्य मनमोहक दिसते. 6 / 8 जर्मनीतील फ्रँकफर्ट परिसरात रेल्वे क्रॉसिंगवर दोन पुरुष त्यांची बोट ओढताना दिसून येतात. मुसळधार पावसाने येथील शेततळे जलमय झाले होते. त्यामुळे, परिसराला पावसाच्या पाण्याने असा वेढा दिलाय. 7 / 8 दरवर्षी जानेवारी महिन्यात येथील परिसरात मुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण होते. 8 / 8हे छायाचित्र पाहून पाण्यातच रस्ता कसा तयार झाला, असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही.