शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थायलंड आणि कंबोडिया यांच्यात 'या' हिंदू मंदिरावरून पेटलंय युद्ध...! नेमका वाद काय? आतापर्यंत मारले गेले आहेत 42 लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:23 IST

1 / 12
थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. थायलंडने कंबोडियन लष्करी तळांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. यापूर्वी गुरुवारी सकाळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सीमेजवळ गोळीबारही झाला.
2 / 12
कंबोडियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आरोप केला आहे की, थाई सैनिकांनी प्रथम गोळीबार केला. तर थाई सैन्याने म्हटले आहे की सैन्य पाठवण्यापूर्वी कंबोडियाने ड्रोन तैनात केला होता, यानंतर तोफ आणि लांब पल्ल्याच्या BM21 रॉकेटने हल्ला करण्यात आला.
3 / 12
दोन्ही देशांमधील या संघर्षाचे कारण आहे ११०० वर्षांपूर्वीचे जुने शिवमंदिर. जे प्रीह विहियर म्हणूनही ओळखले जाते.
4 / 12
हे मंदिर ९ व्या शतकात खमेर सम्राट सूर्यवर्मन यांनी भगवान शिव शंकरांसाठी बांधले होते. मात्र आता हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र राहिलेले नाही, तर राष्ट्रवाद, राजकारण आणि लष्करी शक्तीचा अखाडा बनले आहे.
5 / 12
दोन्ही देशांचा दावा - कंबोडियाचा दावा आहे की हे मंदिर त्यांच्या सीमेत आहे, तर थायलंडचे म्हणणे आहे की, मंदिराचा काही भाग त्यांच्या सुरिन प्रांतात येतो.
6 / 12
खरे तर, हे मंदिर डांगरेक टेकड्यांमधील एका मोक्याच्या खिंडीवर आहे, जिथून एकेकाळी ऐतिहासिक खमेर महामार्ग जात होता, जो आजच्या अंगकोरला (कंबोडिया) आणि फिमाई (थायलंड) ला जोडत होता.
7 / 12
असं आहे वादाचं मूळ कारण? - या वादाची सुरुवात २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून मानली जाते. १९०४ मध्ये, नैसर्गिक पाण्याच्या विभाजनाच्या आधारावर सीमा तयार होईल, असे निश्चित करण्यात आले होते.
8 / 12
मात्र, १९०७ मध्ये फ्रेंच वसाहतवाद्यांनी तयार केलेल्या नकाशात, मंदिर कंबोडियामध्ये दाखवण्यात आले होते. थायलंडने तेव्हा ते स्वीकारले, परंतु १९३० च्या दशकात याला विरोध केला. मात्र, आयसीजेने (आंतरराष्ट्रीय न्यायालय) हा विरोध नाकारला होता.
9 / 12
१९६२ मध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) कंबोडियाला मंदिरावरील अधिकार दिले. तथापि, थायलंडने कधीही हा निर्णय पूर्णपणे स्वीकारला नाही आणि अद्यापही मंदिरालगतच्या जागेवर दावा करत आहे.
10 / 12
२००८ मध्ये कंबोडियाने जेव्हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात मंदिराचा समावेश केला तेव्हा दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. २००८ ते २०११ दरम्यान, मंदिराच्या परिसरावरून अनेकदा संघर्ष झाले.
11 / 12
२०११ मध्ये, दोन्ही देशांत एका आठवडा जोरदार गोळीबार सुरू होता. यात दोन्ही देशांतील एकूण ४२ लोक मारले गेले होते. यात कंबोडियाच्या १९ सैनिक आणि ३ नागरिक तर थायलंडचे १६ सैनिक आणि ४ नागरिकांचा समावेश आहे.
12 / 12
२०११ मध्ये, दोन्ही देशांत एका आठवडा जोरदार गोळीबार सुरू होता. यात दोन्ही देशांतील एकूण ४२ लोक मारले गेले होते. यात कंबोडियाच्या १९ सैनिक आणि ३ नागरिक तर थायलंडचे १६ सैनिक आणि ४ नागरिकांचा समावेश आहे.
टॅग्स :Thailandथायलंडwarयुद्धHinduहिंदूTempleमंदिर