US : ३१ वर्षीय शिक्षिका १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत कारमध्ये ठेवत होती संबंध, वाचा कसा झाला याचा खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 13:31 IST
1 / 6अमेरिकेतील फ्लोरिडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका ३१ वर्षीय ड्रामा शिक्षिकेने १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अनेकदा आपल्याच कारमध्ये शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे.2 / 6New York Post च्या वृत्तानुसार, ही घटना फ्लोरिडाच्या मियामी डेड काउंटी पब्लिक स्कूलमधील आहे. इथे ३१ वर्षीय ड्रामा शिक्षिका ब्रिटनी लोपेज मुर्रे काम करत होती. शिक्षिकेने कथितपणे १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत कारमध्ये अनेकदा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. रिपोर्टनुसार, आरोपी शिक्षिका कारमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याचे न्यूड फोटोही क्लिक करत होती. हे फोटो ती विद्यार्थ्याच्या मोबाइलवर शेअर करत होती.3 / 6पोलीस रिपोर्टनुसार, ही घटना ऑगस्टमधील आहे. ड्रामा शिक्षिका बास्केटबॉल प्रॅक्टिसनंतर विद्यार्थ्याला सोबत नेण्यासाठी त्याची वाट बघत होती आणि नंतर त्याच्यासोबत कारमध्ये संबंध ठेवत होती. रिपोर्टनुसार, शिक्षिका ड्रामा क्लास घेता घेता या विद्यार्थ्याला फसवण्यात यशस्वी ठरली होती.4 / 6या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा मुलाच्या वडिलाने त्याच्या मोबाइल फोनवर त्याचे न्यूड फोटो पाहिले. यानंतर ते मियामी डेड काउंटी पब्लिक स्कूलमध्ये याची तक्रार करण्यासाठी गेले. या प्रकरणाचा खुलासा झाल्यावर शाळेने एक नोट जारी केली आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, शिक्षिकेच्या सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.5 / 6दरम्यान फ्लोरिडामध्ये सहमतीने संबंध ठेवण्यासाठी कायदेशीर वय हे १८ आहे. अशात १४ वर्षाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणंहा इथे गंभीर गुन्हा आहे. 6 / 6महिलेच्या वकिलाने सांगितलं की, ती निर्दोष आहे आणि तिला फसवलं जात आहे. ती म्हणाली की दोषी सिद्ध होईपर्यंत तिला निर्दोष मानलं जावं आणि तिच्या प्रायव्हसीचा सन्मान केला जावा. ब्रिटनीने २०१६ मद्ये लग्न केलं होतं. याच ऑगस्टमध्ये तिने विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणं सुरू केलं होतं.