शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताच्या तिरंग्याप्रमाणेच 'या' देशांच्या ध्वजांना आहेत विशिष्ट नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 8:46 PM

1 / 6
जगभरात अनेक देश आहे, त्या देशांचे ध्वज हे त्यांचं प्रतीक असतं. जगातल्या प्रत्येक देशाचा झेंडा हा तिथल्या लोकांशी भावनिक आणि गौरवशाली इतिहासानं जोडलेला आहे. बऱ्याचदा इतर देशांच्या झेंड्यांना पाकिस्तानचा ध्वज, इंग्लंडचा ध्वज, चीनचा ध्वज म्हणून ओळखले जाते. परंतु भारताच्या ध्वजाला जास्त करून लोक तिरंगा म्हणतात. पण पाकिस्तानसह इतर देशांच्या ध्वजांनाही विशिष्ट अशी नावं आहेत. पाकिस्तान, ब्राझील, कतार, मलेशिया, न्यूझीलंड, यूके(ब्रिटन) या देशांच्या झेंड्यांना तिकड्या अस्मितेशी जोडणारी नावं देण्यात आलेली आहे.
2 / 6
ब्राझील या देशाची राजधानी ब्राझिलिया असून, त्या देशाच्या ध्वजाचं नाव ऑरिव्हर्डे(Auriverde) आहे.
3 / 6
कतार या देशाची राजधानी दोहा असून, तिकडच्या झेंड्याचं नावं इन्नाबी(Innabi) आहे.
4 / 6
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून, त्या देशाच्या झेंड्याचं नाव जालूर जेमिलांग / स्ट्राइप्स ऑफ ग्लोरी (Jalur Gemilang/Stripes of Glory) आहे.
5 / 6
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद असून, झेंड्याचं नाव परचम-ए सितारा ओ-हिलाल आहे.
6 / 6
न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन असून, तिकडचा झेंडा न्यूझीलंड इनसाइन (New Zealand Ensign) आहे.