शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थरारक! २६ मुलांचे अपहरण करून जिवंत गाडणारा गुन्हेगार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 7:21 PM

1 / 5
आता या व्यक्तीचा २५ मार्च रोजी पॅरोल मंजूर करण्यात आला. त्यानंतर या व्यक्तीने 5 दशलक्ष (37 कोटींहून अधिक) खंडणी मागितली होती. फ्रेडरिक न्यूहॉल वुड्स असे या व्यक्तीचे नाव आहे. आता त्यांचे वय ७० वर्षे आहे. (All Photo - AajTak)
2 / 5
पॅरोलची माहिती कॅलिफोर्निया विभागातील सुधारणा आणि पुनर्वसन प्रवक्ते जो ओरलँडो यांनी सीएनएनला केली. पॅरोल आयोगाने वुड्स यापुढे समाजासाठी धोका नसल्याचं स्पष्ट केलं.
3 / 5
चित्रपट पाहिल्यानंतर बनवला अपहरणाचा प्लॅन - 1971 मध्ये डर्टी हॅरी हा चित्रपट आला होता, हे पाहून वुड्सने अपहरणाचा कट आखला होता. तथापि, या प्रकरणातील त्याचे साथीदार, त्याचे भाऊ रिचर्ड आणि जेम्स शॉएनफेल्ड यांना अनेक वर्षांपूर्वी सोडण्यात आले होते. हे सर्वजण सॅन फ्रान्सिस्को खाडीजवळ राहत होते. त्यानंतर चोवचिल्‍ला (सॅन फ्रान्सिस्को) येथे 26 मुलांचे अपहरण केले.
4 / 5
यानंतर या लोकांनी या मुलांना एका बंकरमध्ये जिवंत जमिनीत पुरले. हा बंकर सॅन फ्रान्सिस्कोच्या पूर्वेला होता. ज्या बंकरमध्ये मुले आणि बसचा ड्रायव्हरला लपवले होते. तेथे वेंटिलेशनची व्यवस्था होती. अपहरणानंतर 16 तासांनंतर सर्व अपहरणकर्ते तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले कारण अपहरणकर्ते झोप आली होती. 
5 / 5
17 वेळा पॅरोल अर्ज फेटाळला - जरी वुड्स केवळ 1982 मध्ये पॅरोलसाठी पात्र होता, परंतु त्याचा पॅरोल 17 वेळा नाकारण्यात आला. ही 26 मुले डेरीलँड प्राथमिक शाळेतून परतत असताना 15 जुलै 1976 रोजी ही अपहरणाची घटना घडली. यादरम्यान सायंकाळी ४ वाजता अपहरणकर्त्यांनी पांढऱ्या रंगाच्या दोन व्हॅन पुढे लावून त्यांचा मार्ग अडवला होता. या सर्व मुलांचे वय 5 ते 14 वर्षे दरम्यान होते. ही सर्व मुले जमिनीत 12 फूट खाली गाडली गेली. त्यांना शिडीच्या साहाय्याने व्हॅनमधून खाली उतरवण्यात आले.
टॅग्स :KidnappingअपहरणAmericaअमेरिकाCourtन्यायालय