इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:10 IST
1 / 7अमेरिकेच्या हल्ल्यानंतर, पश्चिम आशियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणच्या हल्ल्याची शक्यता वाढली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने कतार, बहरीन, इराक, कुवेत, युएई आणि सौदी अरेबियासह अनेक देशांमध्ये आपले लष्करी आणि नौदल तळ बांधले आहेत. 2 / 7अमेरिका त्यांचा वापर गुप्तचर यंत्रणा, रसद आणि लष्करी कारवाया चालविण्यासाठी करत आहे. अमेरिकेच्या प्रमुख लष्करी तळांबद्दल जाणून घ्या... 3 / 7अल उदीद हवाई तळ (कतार): मध्य पूर्वेतील सर्वांत मोठा १९९६ मध्ये बांधलेला हा अमेरिकन लष्करी तळ आहे. २४ हेक्टर (६० एकर) क्षेत्रात पसरलेला हा तळ सुमारे १०० विमाने आणि ड्रोनसह सुसज्ज आहे. येथे सुमारे १०,००० सैनिक तैनात आहेत. इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानात येथून ऑपरेशन्स चालविली गेली.4 / 7नौदल सपोर्ट अॅक्टिव्हिटी (बहरीन) : हे नौदल तळ माजी ब्रिटिश नौदल प्रतिष्ठान, एचएमएस जुफेअरजागेवर स्थित आहे. या तळावर लष्करी आणि नागरी कर्मचाऱ्यांसह सुमारे ९,००० कर्मचारी कार्यरत आहेत. हे तळ जहाजे, विमाने, सैन्य आणि परिसरातील दुर्गम ठिकाणांना सुरक्षा प्रदान करते.5 / 7अर्बिल हवाई तळ (इराक) : अमेरिकेचे इराकमध्ये अनेक लष्करी तळ आहेत, ज्यात अर्बिल हवाई तळ, अल-हरीर आणि अल असद विमानतळ यांचा समावेश आहे. अमेरिकन सैन्य हवाई कारवाईसाठी याचा वापर करते. २०२३ मध्ये गाझावर इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण समर्थक गटांनी या ठिकाणी वारंवार हल्ला केला आहे.6 / 7कॅम्प आरिफजान (कुवैत) : कुवेतमध्ये दोन एअरबेस आणि इतर अनेक चौक्या आहेत. कॅम्प आरिफजान हा आग्नेय भागातील मुख्य अमेरिकन लष्करी तळ आहे. १९९९ मध्ये बांधलेला हा तळ मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी कारवायांसाठी वाहतूक, पुरवठा आणि कमांड हब म्हणून काम करतो.7 / 7अल दहफरा (यूएई) : अल दहफरा हवाई तळावर १० अमेरिकन विमान स्क्वॉड्रन आणि एमक्यू - २ रीपर ड्रोन आहेत. हे गुप्तचर माहिती गोळा करणे आणि लढाऊ हवाई ऑपरेशन्ससाठी महत्त्वाचे तळ आहे. या तळावर एफ-२२ रॅप्टर स्टील्थ फायटर, ड्रोन आणि अवाक्ससारखी प्रगत विमाने आहेत. सौदी अरेबिया, इजिप्त आणि जॉर्डनमध्येही अमेरिकेचे तळ आणि चौक्या आहेत.