शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...म्हणून आतापर्यंत भारत किंवा आशियामधून झाली नाही पोपची निवड, असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:31 IST

1 / 6
ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोप फ्रान्सिस हे त्यांच्या देशामधील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे, असे एका कार्डिनलने सांगितले आहे. तसेच पोप यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे एका भारतीय कार्डिनलने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. पोप फ्रान्सिस यांच्या बिघडलेल्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पोपच्या निवडीची चर्चा सुरू झाली आहे.
2 / 6
या संदर्भात जेव्हा कार्डिनलनां विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य नियमानुसार जेव्हा कुठलेही पोप पद सोडण्याचा निर्णय घेतात तेव्हा सर्वा कार्डिनल्सची बैठक बोलावली जाते. तसेच त्यात निवृत्तीचा निर्णय घेतला जातो. याआधीचे पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी असं केलं होतं. दरम्यान, सध्या तरी अशा प्रकारची कुठलीही बैठक झालेली नाही, अशी माहिती या भारतीय कार्डिनलनी दिली आहे.
3 / 6
पोपची निवड कशी होते, असे या कार्डिनलनां विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, यासाठीच्या निवड मंडळात कार्डिनलचा समावेश असतो. तसेच ८० वर्षांपेक्षा कमी वयाचे सर्वजण नव्या पोपच्या निवडीसाठी मतदान करतात. मतदानाचा अधिकार असलेले सर्व कार्डिनल हे पोप बनण्यास पात्र असतात. माझ्या माहितीप्रमाणे सुमारे १३० कार्डिनल असून, ते पुढील पोपच्या निवडीसाठी मतदान करतील. मात्र ८० वर्षांवरील कार्डिनलची संख्या ही त्यापेक्षा अधिक आहे.
4 / 6
पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी हा आफ्रिका किंवा आशियामधील असेल, असे दावे केले जात आहेत. लोकसंख्या हे यामागचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. व्हेटिकनच्या आकडेवारीनुसार २०२२ अखेरीस सुमारे १.४ अब्ज एवढ्या कॅथलिक लोकसंख्येपैकी ३१ टक्के लोकसंख्या ही या खंडांमध्ये वास्तव्यास आहे. दरम्यान, हे आकडे या दोन्ही खंडांचं महत्त्व कमी करून मांडले जातात, असाही दावा करण्यात येतो. या आकडेवारीत चीनचा समावेश केला जात नाही, तिथे १२ दशलक्ष एवढे कॅथलिक अनुयायी आहेत.
5 / 6
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आशियामध्ये केवळ ३७ कार्डिनल आहेत. जे एकूण कार्डिनलच्या तुलनेत केवळ १४.७ टक्के एवढेच आहेत. तर आफ्रिकेत ही संख्या आणखीनच कमी आहे. येथे केवळ २९ कार्डिनल आहेत. भारताचा विचार केल्यास भारतामध्ये केवळ सहा कार्डिनल आहेत. त्यापैकी चार कार्डिनलकडे मतदानाचा अधिकार आहे. तर युरोपमध्ये एकट्या इटलीमध्ये १७ कार्डिनल आहेत.
6 / 6
आणखी एक महत्त्वाची माहिती म्हजे पोप बनण्यासाठी एका व्यक्तीची कॅथलिक चर्चच्या सर्वोच्च पदावर निवड होते. आतापर्यंत हे पद युरोपिय आणि मुख्यत्वेकरून इटालियन पाद्रींच्या माध्यमातून बहुतांश वेळा भरलं गेलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे कॅथलिक चर्चचा इतिहास हा युरोपमधून सुरू झाला. तसेच तिथून याचा जगभरात विस्तार झालेला आहे. याशिवाय चर्चच्या सर्वोच्च पदावर पोहोचणारे पाद्री हे युरोपमध्ये वास्तव्यास असतात. तसेच चर्चची रचना आणि प्रशासन हे सुद्धा बहुतकरून युरोपमध्ये स्थापित झालेले आहेत.
टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेItalyइटलीIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय