आकाराने गोव्यापेक्षाही लहान, नांदतात सगळेच श्रीमंत! 'हा' छोटासा देश कसा बनला कुबेराचा खजिना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:24 IST
1 / 8भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्याचे नाव सर्वांनाच माहित आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, गोव्यापेक्षाही आकाराने लहान असलेला एक देश जगात असा आहे, जिथला प्रत्येक दुसरा माणूस करोडोंमध्ये खेळतोय. 2 / 8पश्चिम युरोपमधील 'लक्झमबर्ग' हा तो देश. अवघ्या २,५८६ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांची जीवनशैली पाहून जगातील मोठमोठे देशही थक्क झाले आहेत.3 / 8गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौरस किलोमीटर आहे, तर लक्झमबर्ग त्यापेक्षाही लहान म्हणजे २५८६ चौरस किलोमीटर आहे. मात्र, श्रीमंतीच्या बाबतीत हा देश खूप पुढे आहे. वर्ल्ड बँक आणि सीआयएच्या अहवालानुसार, लक्झमबर्गमधील दरडोई उत्पन्न तब्बल १ कोटी ६ लाख ४२ हजार रुपये इतके आहे. जगातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या देशांच्या यादीत हा देश सातत्याने अव्वल स्थानी असतो.4 / 8१९ व्या शतकापर्यंत लक्झमबर्गमधील ८० टक्के लोक शेती करायचे आणि त्यांचे जीवन अत्यंत गरिबीत होते. त्यानंतर येथे लोखंड आणि पोलाद उद्योगाची भरभराट झाली आणि देशाचे नशीब पालटले. एकेकाळी पोलाद निर्मितीवर अवलंबून असलेला हा देश आज जगातील सर्वात मोठे 'गुंतवणूक व्यवस्थापन केंद्र' बनला आहे.5 / 8लक्झमबर्गची कर प्रणाली अत्यंत लवचिक आहे. कॉर्पोरेट टॅक्स कमी असल्याने जगातील बड्या कंपन्या येथे आकर्षित होतात. अॅमेझॉनचे युरोपीय मुख्यालय येथे आहे. गुगल येथे १ अब्ज युरोचा डेटा सेंटर उभारत आहे. फेरारी, मायक्रोसॉफ्ट, फेसबूक आणि एचएसबीसीसारख्या कंपन्यांची मोठी कार्यालये येथे आहेत.6 / 8येथील बँकिंग क्षेत्र अत्यंत मजबूत असून राजकीय स्थिरता हे उद्योगांच्या वाढीसाठी मुख्य कारण आहे. एका अहवालानुसार, या छोट्याशा देशात तब्बल २६६ अब्जाधीशांची संपत्ती आहे, जी युरोपीय महासंघातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे.7 / 8केवळ बँकिंगच नाही, तर पर्यटनही येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. २०१९ च्या आकडेवारीनुसार, येथील एकूण रोजगारापैकी ८.३ टक्के वाटा पर्यटन क्षेत्राचा होता. निसर्गरम्य वातावरण आणि ऐतिहासिक वारसा यामुळे जगभरातील पर्यटक येथे हजेरी लावतात. 8 / 8योग्य नियोजन, स्टार्टअप्सना दिलेले प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी अनुकूल वातावरण यामुळे गोव्यापेक्षाही लहान असलेला हा देश आज जगासाठी 'श्रीमंतीचा रोल मॉडेल' बनला आहे.