अंतराळातून परतलेल्या शुभांशू शुक्लांचा फॅमिली फोटो; पत्नी आणि मुलाला मारली कडकडून मिठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 23:10 IST
1 / 7जेव्हा शुभांशू कॅप्सूलमधून बाहेर आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते. त्यांनी हात वर करून सर्वांना अभिवादन केले, त्यानंतर त्यांना आयसोलेशन कक्षात नेण्यात आले. शुभांशू आणि इतर अंतराळवीरांना पुढील एका आठवड्यासाठी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.2 / 7जेव्हा शुभांशू कॅप्सूलमधून बाहेर आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते. त्यांनी हात वर करून सर्वांना अभिवादन केले, त्यानंतर त्यांना आयसोलेशन कक्षात नेण्यात आले. शुभांशू आणि इतर अंतराळवीरांना पुढील एका आठवड्यासाठी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.3 / 7अंतराळातून परतलेल्या शुंभांशू शुक्ला यांनी त्यांची पत्नी कामना आणि सहा वर्षांच्या मुलाची भेट घेतली ज्याचे भावनिक फोटो त्यांनी शेअर केले आहेत.4 / 7फोटो शेअर करताना शुभांशू यांनी म्हटलं की, 'अंतराळ प्रवास हा एक अनोखा अनुभव आहे, पण बऱ्याच काळानंतर प्रियजनांना भेटणेही तितकेच आश्चर्यकारक आहे. मला क्वारंटाईनमध्ये राहून दोन महिने झाले आहेत. क्वारंटाईन दरम्यान, जेव्हा कुटुंब भेटायला आले तेव्हा आम्हाला आठ मीटर अंतर राखावे लागले. माझ्या धाकट्या मुलाला समजावून सांगण्यात आले की त्याच्या हातावर जंतू आहेत, त्यामुळे तो त्याच्या वडिलांना स्पर्श करू शकत नाही.'5 / 7तो जेव्हा जेव्हा भेटायला यायचा तेव्हा तो त्याच्या आईला विचारायचा, 'मी माझे हात धुवू शकतो का?' तो खूप कठीण काळ होता. जेव्हा मी पृथ्वीवर परतलो आणि माझ्या कुटुंबाला पुन्हा मिठी मारली, तेव्हा मला असे वाटले की मी पुन्हा घरी परतलो आहे. 6 / 7आज, तुमच्या जवळच्या एखाद्याला मिठी मारा आणि त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता. आपण अनेकदा जीवनाच्या धावपळीत इतके गुंतून जातो की आपण आपल्या प्रियजनांचे महत्त्व विसरतो. मानवी अंतराळ मोहिमा जादुई असतात, परंतु त्यांना जादुई बनवणारी गोष्ट म्हणजे मानव.7 / 7आज, तुमच्या जवळच्या एखाद्याला मिठी मारा आणि त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता. आपण अनेकदा जीवनाच्या धावपळीत इतके गुंतून जातो की आपण आपल्या प्रियजनांचे महत्त्व विसरतो. मानवी अंतराळ मोहिमा जादुई असतात, परंतु त्यांना जादुई बनवणारी गोष्ट म्हणजे मानव.