By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:46 IST
1 / 8साधारणपणे गेल्या ४० दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण युद्धात आता दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाली आहे. युद्धविरामाच्या या घोषणेनंतर संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. 2 / 8यासाठी पाकिस्तान आणि चीनने महत्वाची भूमिका बजावल्याचे समोर येत आहे. यातच आता, युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दोन फोन कॉल्सची 'इनसाईड स्टोरी' समोर आली आहे. त्यांनी एक फोन कॉल पाकिस्तानला केला, तर दुसरा इस्रायलला...3 / 8न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी थेट चर्चा केली.4 / 8ट्रम्प यांनी शरीफ यांना डच्चू देत मुनीर यांना का केला फोन? - शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असले, तरी इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी ट्रम्प यांनी मुनीर यांच्यावरच विश्वास टाकला. सध्या मुनीर हे ट्रम्प यांच्या फेव्हरिट लिस्टमध्ये असल्याचे मानले जाते. 5 / 8खरेतर, मुनीर यांचे इराणच्या लष्करी नेतृत्वाशी असलेले सलोख्याचे संबंध, हेच यामागील मुख्य कारण आहे. महत्वाचे म्हणजे, जेव्हा शहबाज शरीफ केवळ ट्विट करत होते, तेव्हा इराणचे सैन्य आणि अमेरिका यांच्यात मुनीर यांनीच मध्यस्थाची भूमिका बजावली. तेच अमेरिका आणि इराण यांच्यात संदेशांची देवाणघेवाण करत होते.6 / 8ट्रम्प यांनी केली नेतन्याहू यांची मनधरणी - दुसरीकडे, ट्रम्प यांनी दुसरा फोन कॉल केला तो इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांना. हिवाळ्यातील बैठकांमध्ये नेतन्याहू यांनी इराणवर संयुक्त हल्ल्यासाठी दबाव टाकला होता. 7 / 8मात्र आता ट्रम्प यांनी नेतन्याहू यांच्याशी युद्धविरामासंदर्भात चर्चा केली असावी आणि अखेरीस, दोन आठवड्यांसाठी हल्ले थांबवण्याची घोषणा करण्यात आली. माध्यमांतील वृत्तांनुसार, ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना बॉम्बिंग रोखण्यासाठी राजी केले. पण ते थांबण्याच्या मनःस्थितीत नव्हते, असे बोलले जात आहे8 / 8डोनाल्ड ट्रम्प...