पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेच्या तिजोरीत खडखडाट; सौदी अरेबिया ३ अब्ज डॉलर्सचं देणार दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 11:57 IST
1 / 9आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानला (Pakistan) लवकरच सौदी अरेबियाकडून तीन अब्ज डॉलर्सचं कर्ज मिळणार आहे. यादरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळानं (Imran Khan Cabinet) ही रक्कम देशाच्या केंद्रीय बँकेत ठेवण्यास सहमती दिली आहे.2 / 9पाकिस्तानमधील वृत्तवाहिनी जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार सौदी अरेबिया सरकारनं स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये (SBF) तीन अब्ज डॉलर्सची रक्कम ठेवण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. करारानुसार ही मदत राशी SBP च्या जमा खात्यात एका वर्षांपर्यंत राहणार आहे.3 / 9'एसबीपीनं सर्व प्रक्रियांना अंतिम रुप दिलं आहे आणि ही रक्कम पुढील काही दिवसांमध्ये मिळेल,' अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं द न्यूजनं दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं सौदी अरेबियाकडून तीन अब्ज डॉलर्सची मदत रक्कम SBP मध्ये ठेवण्यास मंजुरी दिली आहे. 4 / 9पाकिस्तानला पुढील ६० दिवसांमध्ये तीन ठिकाणांहून सात अब्ज डॉलर्सची रक्कम मिळण्याची अपेक्षा असल्याचं मत पंतप्रधान इम्रान खान यांच्या सल्लागारांचे प्रवक्ते मुजम्मिल अस्लम यांनी दिली.5 / 9एका अन्य रिपोर्टनुसार सौदी अरेबिया सरकार तात्काळ एका वर्षासाठी पाकिस्तानच्या खात्यात तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स जमा करणआर आहे. तसंच किमान ऑक्टोबर २०२३ पर्यंत आयएमएफ कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत हे सुरू ठेवण्यात येईल. तसंच सौदी सरकार प्रत्येक वर्षी १.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सचं कर्ज अधार देणार आहे, असंही एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं सांगण्यात आलं.6 / 9इम्रान खान यांच्या हाती पंतप्रधानपदाची धुरा गेल्यानंतर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अधिक बिकट होताना दिसत आहे. शुक्रवारी पाकिस्तानच्या स्टेट बँकेनं जी आकडेवारी सादर केली, त्यानंतर संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे.7 / 9तर दुसरीकडे इम्रान खान सातत्यानं जागतिक बँक आणि इंटरनॅशनल मॉनेटरी फंडातून कर्ज घेत आहेत. ३१ डिसेंबर २०२० च्या आकडेवारीनुसार पाकिस्तानवर एकून ११५,७५६ अब्ज डॉलर्सचं कर्ज होतं.8 / 9स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं जारी केलेल्या आपल्या रिपोर्टनुसार ऑक्टोमध्ये पाकिस्तानची चालू खात्यातील तूट वाढून १.६ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. ही आकडेवारी सप्टेंबरच्या तुलनेत अधिक आहे.9 / 9हा आकडा पाकिस्तानच्या जीडीपीच्या ४.७ टक्के असल्याचं म्हटलं जात आहे. पाकिस्तान सरकारनं या वर्षी चालू खात्यातील तूट जीडीपीच्या दोन ते तीन टक्के ठेवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. परंतु हे कमी होण्याऐवजी दुपटीनं वाढल्याचं दिसून येत आहे.