मिसाईल, बुलेट आणि पाण्यातही सुरक्षित; जगातील सर्वात अभेद कार करते पुतिन यांची कडेकोट सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:38 IST
1 / 7अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेल्या जागतिक नेत्यांपैकी एक म्हणून पुतिन यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था आणि बुलेटप्रूफ कार नेहमी त्यांच्यासोबत असते. ऑरस सेनात ही जगातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक मानली जाते.2 / 7पुतिन यांची ही अधिकृत लिमोझिन कार ऑरस सेनात एक रशियन लक्झरी सेडान असून, तिला रशियन रॉल्स रॉयस म्हणूनही ओळखले जाते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बीस्ट कारप्रमाणेच, सेनात ही पुतिन यांच्यासाठी खास तयार केलेली बुलेटप्रूफ कार आहे.3 / 7ही कार VR10 लेव्हलच्या बॅलिस्टिक संरक्षणासह येते. त्यामुळे बुलेट, स्फोट किंवा कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून आत बसलेल्या व्यक्तीला सुरक्षित ठेवते.4 / 7महत्त्वाचे म्हणजे ही कार पाण्यामध्ये पडल्यास बुडत नाही, तर पाणबुडीप्रमाणे काम करू शकते. जर टायर निकामी झाले तरी कारचा वेग कायम राहतो आणि ती सुसाट धावत राहते.5 / 7यात ४.४ लीटर क्षमतेचे V8 हाइब्रिड इंजिन आहे, जे ५९८ हॉर्स पॉवरची ताकद आणि ८८९ न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते. यात नऊ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही कार ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीमसह येते. ही कार ६ ते ९ सेकंदांत ० ते १०० किमी प्रतितास इतका वेग पकडू शकते. याची टॉप स्पीड २४९ किलोमीटर प्रतितास पर्यंत आहे.6 / 7ऑरस सेनातचे इंटीरियर अत्यंत आरामदायक आणि आलिशान आहे. यात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. लक्झरी आणि आरामदायक सीट, उत्कृष्ट इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि लेदर अपहोल्स्ट्री यासारख्या सुविधांनी ही कार सुसज्ज आहे. चीनमध्ये शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रशियन राष्ट्राध्यक्षांसोबत याच कारमधून प्रवास केला होता.7 / 7ऑरस सेनात ही कार २०१८ मध्ये बाजारात आणली गेली. त्यावेळी तिची किंमत सुमारे १.३२ कोटी रुपये होती, जी २०२१ मध्ये वाढवून २.४० कोटी रुपये करण्यात आली. मात्र, पुतिन वापरत असलेल्या कारची किंमत या मूळ किमतीपेक्षा खूप जास्त आहे.