स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:04 IST
1 / 6स्पेनच्या राजघराण्यात तब्बल दीड शतकानंतर (१५० वर्षे) एक ऐतिहासिक बदल घडणार आहे. स्पेनचे राजे फेलिप सहावे यांच्यानंतर त्यांची थोरली मुलगी राजकुमारी लिओनोर देशाची धुरा सांभाळणार आहे. 2 / 6विशेष म्हणजे, १८३३ नंतर स्पेनच्या गादीवर बसणारी ती पहिली 'क्वीन' (महाराणी) ठरेल. तिच्या या प्रवासाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.3 / 6स्पेनच्या जुन्या कायद्यानुसार, राजपुत्राला राजकन्येपेक्षा वारसा हक्कासाठी प्राधान्य दिले जात असे. मात्र, राजकुमारी लिओनोरच्या जन्मानंतर आणि आधुनिक काळाची गरज ओळखून या परंपरेला छेद देण्यात आला. आता ती अधिकृतपणे स्पेनची भावी महाराणी म्हणून घोषित करण्यात आली आहे.4 / 6लष्करी प्रशिक्षण घेणारी राजकुमारी लिओनोर केवळ राजवाड्याच्या सुखात राहिलेली नाही. तिने भविष्यातील जबाबदारी ओळखून 'स्पॅनिश जनरल मिलिटरी अकॅडमी'मध्ये कठोर लष्करी प्रशिक्षण घेतले आहे.5 / 6भूदल, नौदल आणि वायुदल अशा तिन्ही दलांचे ज्ञान तिने आत्मसात केले असून, महाराणी बनल्यावर ती स्पॅनिश सशस्त्र दलांची सर्वोच्च कमांडर देखील असेल.6 / 6तिला स्पॅनिश व्यतिरिक्त इंग्रजी, फ्रेंच आणि इतर प्रादेशिक भाषा अवगत आहेत. तिने युनायटेड किंगडममध्ये तिचे आंतरराष्ट्रीय शिक्षण पूर्ण केले आहे. तिला स्पेनच्या तरुण पिढीचा 'आधुनिक आणि प्रगत चेहरा' मानले जाते.