ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:03 IST
1 / 10इस्रायल-इराण युद्धविराम जारी झालेला असताना इराणबाबत एक मोठी बातमी येत आहे. ज्या अणु ठिकाणांवर अमेरिकेने बंकर बस्टर बॉम्बने हल्ले केले ती इराणचीच अमेरिका आणि इस्रायलला चकमा देण्याची एक चाल होती, असे समोर येत आहे. इराणने या दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांना चकवत दुसरीकडेच सिक्रेट अड्डा तयार केला होता, असे समोर येत आहे. 2 / 10इराणमध्ये अमेरिकेने तीन अणु अड्ड्यांवर हल्ला केल्यानंतर कुह-ए-कोलांग गज-ला या शब्दाची चर्चा सुरु झाली आहे. इराणने इस्रायली मोसादलाच नाही तर अमेरिकेच्या सॅटेलाईटना देखील चकमा देत नतांझपासून काही अंतरावर अणु कार्यक्रमासाठी सिक्रेट ठिकाण उभारले होते, याठिकाणीच हे समृद्ध युरेनियम लपवून ठेवण्यात आले, असा दावा करण्यात आला आहे. 3 / 10अमेरिकेने १२८ विमानांद्वारे इराणच्या फोर्डो, इस्फहान आणि नतांजवर हल्ले चढविले होते, यात इराणच्या फोर्डोवर सर्वाधिक बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यात आले होते. परंतू इराणने त्यापूर्वीच दोघांच्याही नाकावर टिच्चून एक सिक्रेट अड्डा बनविला होता, त्यामध्ये सर्व युरेनियम आणि अण्वस्त्र बनविण्यासाठी लागणारी सामुग्री लपविली होती. 4 / 10कुह-ए-कोलांग गझ-ला किंवा पिकॅक्स माउंटन असे या ठिकाणाला म्हटले जात आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) महासंचालकांनी इराणला पिकॅक्स पर्वताखाली काय चालले आहे असे विचारले होते. यावर इराणने काहीसे चिडखोर उत्तर दिले होते. 'त्याचाशी तुमचा संबंध नाही'' असे उत्तर इराणने दिले होते. 5 / 10अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने इराणचा अणु कार्यक्रम उध्वस्त केल्याचा दावा केला आहे. परंतू, इराण म्हणतेय की आमचा युरेनियम साठा सुरक्षित आहे आणि अणु कार्यक्रम सुरुच राहणार आहे. अशावेळी IAEA च्या महासंचालकांचा प्रश्न आता चिंतेत बदलू लागला आहे. 6 / 10फोर्डोवर हल्ल्यापूर्वी अणुऊर्जा प्रकल्पाबाहेर १६ ट्रक रांगेत दिसले होते. टेलिग्राफला इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील एका तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने बॉम्बस्फोट करण्यापूर्वी इराण सरकारने त्यांचे अत्यंत समृद्ध युरेनियम एका गुप्त ठिकाणी हलवले होते.7 / 10 ते गुप्त ठिकाण कुह-ए-कोलांग गज-ला किंवा पिकॅक्स पर्वत असू शकते, असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. याचबरोबर तेहरानकडे एवढी गुप्त ठिकाणे आहेत तिथेही हे युरेनियम साठविले जाऊ शकते. 8 / 10हे जे सिक्रेट ठिकाण सांगितले जात आहे ते तेहरानच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटर, फोर्डोपासून ९० मैल आणि नतांजपासून अवघ्या काही मिनिटांवर आहे. 9 / 10प्लॅनेट लॅब्स नावाच्या संस्थेने या जागेची सॅटेलाईट फोटो एप्रिलमध्ये घेतले होते. तेव्हा इराण तिथे खोदाई करत असल्याचे दिसले होते. पर्वताच्या उतारावर चार बोगदे खोदण्यात आले आहेत, प्रत्येक बोगदा ६ मीटर (२० फूट) रुंद आणि ८ मीटर (२६ फूट) उंच आहे.10 / 10हा अणु तळ १,६०८ मीटर उंच पर्वताखाली बांधला जात आहे. फोर्डो हा ९६० मीटर उंच पर्वताखाली होता. असे झाले तर अमेरिकेचे बंकर बस्टर बॉम्बही या तळाचे काही करू शकणार नाहीत.