शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाकिस्तानात सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; निषेधार्थ रस्त्यावर उतरली जनता,

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 7:54 PM

1 / 6
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली
2 / 6
ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केलं.
3 / 6
पाकिस्तानी वृत्तपत्र ' द डॉन' च्या वृत्तानुसार पंजाब प्रांतातील कासुर जिल्ह्यात काल पीडित मुलीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. त्यांनंतर या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे.
4 / 6
या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेच्या विरुद्ध इथली जनता रस्त्यावर उतरली आहे.
5 / 6
पीडित मुलीचे आई-वडील तिर्थयात्रेसाठी गेले असताना ही घटना घडली. आई-वडील घरी नसल्याने चिमुरडी आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती. दरम्यान, पोलिसांनी या घटनेत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
6 / 6
पाकिस्तानातून सर्वच स्तरावरुन विरोध केला जात आहे. सोशल मीडियावरही लोक आपला रोष व्यक्त करत आहेत
टॅग्स :Pakistanपाकिस्तान