जगातील सर्वाधिक लठ्ठ मुलानं घटवलं वजन, पाहा कसा दिसतो त्याचा नवीन लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 15:39 IST
1 / 7 जगभरातून सर्वात जास्त वजनाचा मुलगा म्हणून एकेकाळी प्रसिद्ध असाणारा आर्या परमाना आता खूप बारिक झाला आहे. आर्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2 / 7इंडोनेशियामध्ये राहणाऱ्या आर्या परमानाचे वजन जवळपास 193 किलोग्राम होते. तसेच आर्याला जगात सर्वात जास्त वजन असलेला मुलगा म्हणून ओळखले जात होते. मात्र आता आर्या खूप बारिक झाला आहे.3 / 7 डेली मेलच्या रिपोर्टनूसार, आर्या परमानाचे फोटो त्याच्या जिम ट्रेनरने देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे.4 / 72016 मध्ये आर्या जेव्हा 10 वर्षाचा होता, तेव्हापासून त्याने वजन कमी करण्यास सुरुवात केली होती. 5 / 7आर्याची सर्जरी करण्यात आली होती. परंतु अजूनही जास्त असलेली चरबी कमी करण्यासाठी पुन्हा कमीत कमी दोनवेळी सर्जरी करण्याची गरज असल्याचे आर्याच्या वडिलांनी सांगितले.6 / 7 आर्याची जिम ट्रेनरसोबतची भेट 2016मध्ये झाली होती. ट्रेनरने सांगितले की, जेव्हा मी आर्याला भेटलो तेव्हा त्याने मला पोषक आहार संबंधीत माहिती देण्याची विनंती केली. यानंतर त्याने नियमानूसार आहार घेणे, व्यायाम करणे सुरु केले. 7 / 7वजन कमी झाल्यानंतर आर्या आता चालू- फिरु शकतो. तसेच टेनिस, फुलबॉल, बैडमिंटन यांसारखे खेळ आर्या आता खेळू शकतो.