शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:21 IST

1 / 10
जर तुम्ही नेपाळला फिरण्याचा प्लॅन करत असाल किंवा कायम तिथे येणे जाणे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील एक दशकापासून भारतीय पर्यटक आणि तिथे काम करणाऱ्या लोकांची आर्थिक व्यवहारातील मोठी डोकेदुखी कायमची संपणार आहे.
2 / 10
नेपाळ सरकारने १० वर्ष जुने निर्बंध हटवून भारतीय चलनाबाबत नियमात शिथिलता आणली आहे. आता नेपाळ दौऱ्यासाठी नोटा बदलण्याची अथवा चिल्लर जमा करण्याची झंझट कमी होणार आहे. कारण नेपाळने भारतीय २०० आणि ५०० रूपयांच्या नोटा बाजारात वापरण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
3 / 10
सोमवारी नेपाळ कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. सरकारने आता भारतीय आणि नेपाळी नागरीक त्यांच्या प्रवासावेळी २०० आणि ५०० रूपयांच्या नोटा बाळगू शकतात हे ठरवले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या नियमांत बदल करत शेजारील देशात मोठे चलन घेऊन जाण्यास सूट दिली आहे त्यानंतर नेपाळने हा निर्णय घेतला.
4 / 10
परंतु पर्यटकांनी आणखी एक काळजी घेतली पाहिजे की सरकारने यासाठी एक मर्यादा आखून दिली आहे. पर्यटक जास्तीत जास्त २५ हजार रूपयांपर्यंत भारतीय चलन नेपाळमध्ये घेऊन जाऊ शकता. हे पाऊल केवळ पर्यटकांसाठी फायद्याचे नसणार तर यातून दोन्ही देशांतील व्यावसायिक संबंधही आणखी वाढण्याची शक्यता आहे.
5 / 10
नोटांच्या या निर्बंधामुळे नेपाळची अर्थव्यवस्था, विशेषत: पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसत होता. नेपाळच्या कसिनो, मोठ्या हॉटेलमध्ये आणि सीमेवरील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मागील काही वर्षात खूप नुकसान सहन करावे लागले होते.
6 / 10
भारतातून नेपाळला जाणारे पर्यटक याआधी मोठ्या नोटा सोबत घेऊन जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांची खर्च करण्याची क्षमता मर्यादित राहत होती. अनेकदा भारतीय पर्यटकांना चलनातील नियमांची माहिती नसल्याने भुर्दंड सहन करावा लागत होता.
7 / 10
आता नेपाळ सरकारने त्यांच्या नियमांत सूट दिल्याने नेपाळच्या पर्यटन क्षेत्रासह इतर सेक्टरलाही बूस्ट मिळणार आहे. त्याठिकाणी भारतीय पर्यटक जाऊन दिलखुलासपणे खर्च करू शकतील.
8 / 10
नेपाळच्या राष्ट्रीय बँकेचे प्रवक्ते गुरू प्रसाद पौडेल यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारने हा निर्णय घेतला असून आता केवळ औपचारिकता बाकी असल्याचं म्हटले. नेपाळ रात्रपत्रात हा निर्णय प्रकाशित होईल. त्यानंतर केंद्रीय बँक तातडीने परिपत्रक जारी करतील. त्या परिपत्रकात भारतातील २०० आणि ५०० च्या नोटा कायदेशीरपणे वापरण्यास मान्यता असेल.
9 / 10
नेपाळमध्ये नेपाळी रूपया चलन वापरात असते. नेपाळ राष्ट्र बँकेकडून हे वितरीत केले जाते. त्यावर पर्वत, तिथली संस्कृती आणि राजचिन्हे छापलेली असतात. भारतीय १ रूपया हा १.६ रूपये नेपाळी चलनाच्या बरोबरीचा आहे. म्हणजे भारताचे १०० रूपये म्हणजे नेपाळमध्ये १६० रूपये होतात. हा दर अनेक वर्षापासून स्थिर आहे त्यात फारसा बदल नाही.
10 / 10
आर्थिक सुरक्षितता, बनावट नोटांचा धोका आणि चलन नियंत्रण यासाठी नेपाळने भारतीय चलनावर मर्यादा घातल्या होत्या. भारतीय चलनाचा अतिवापर होत असल्याने नेपाळी रूपयांचा व्यवहार कमी होत होता. त्यामुळे स्वत:च्या चलनाचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी नेपाळने भारतीय चलनावर निर्बंध घातले होते.
टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतtourismपर्यटन