बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:59 IST
1 / 10नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया अॅप्सवरील बंदीविरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजधानी काठमांडूसह देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत. अनेक शहरांमध्ये आंदोलक तरुणांकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. 2 / 10आंदोलकांच्या संतापापासून राष्ट्रपतींचे खासगी निवासस्थानही सुटले नाही. आंदोलकांनी तेही पेटवून दिले. अखेर, अशा एकूण परिस्थितीत नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, ते देश सोडून पळाल्याचा दावा नेपाळी वृत्त वाहिन्यांनी केला आहे. 3 / 10यातच आता, केपी ओली यांची संपत्ती आणि परदेशातील गुंतवणीकीसंदर्भातही चर्चा होऊ लागली आहे. तर, माध्यमांतील वृत्तांनुसार, ओली यांची नेपाळमध्ये 60 कोटी रुपयांपेक्षाही अधिकची संपत्ती आहे. याशिवाय, स्विस बँकेच्या अकाउंटमध्येही कोट्यवधी रुपये आहेत.4 / 10स्विस बँकेत 41 कोटी... माध्यमांतील वृत्तांनुसार आणि ग्लोबल वॉच अॅनालिसिसच्या अहवालानुसार, ओली यांचे स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथील मीराबॉड बँकेच्या शाखेत खाते आहे, येथे त्यांचे सुमारे ४१ कोटी रुपये जमा आहेत. 5 / 10ही रक्कम त्यांनी गुंतवणूक म्हणून ठेवली आहे. यातून त्यांना दरवर्षी सुमारे १.८७ कोटी रुपयांचा परतावा मिळतो. 6 / 10नेपाळसारख्या देशातील एखाद्या सार्वजनिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यासंदर्भात विचार करता, ही गुंतवणूक फार मोठी मानली जात आहे. यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, एवढ्या मोठ्या रकमेचा स्त्रोत काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.7 / 10चीनसोबत जस-जसे संबंध वाढत गेले, तस-तशी संपत्तीही वाढत गेली - तज्ञ आणि तपास अहवालांनुसार, ओली यांच्या संपत्तीत अनपेक्षित वाढ होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे, त्यांची चीनशी असलेली वाढती जवळीक. नेपाळमधील मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि व्यवसायांमध्ये चिनी कंपन्यांना फायदा देण्याच्या बदल्यात, ओली यांना वैयक्तिक आर्थिक फायदेही मिळाले. 8 / 10चीनच्या गुंतवणूक आणि व्यावसायिक सहकार्यामुळे ओली यांच्या संपत्तीत वाढ झाली. यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय वाढ झाली. मात्र, या संबंधाचा नेपाळच्या अंतर्गत राजकारणावर मोठा परिणाम होत आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. 9 / 10महत्वाचे म्हणजे, 73 वर्षीय केपी शर्मा ओली हे तीन वेळा नेपाळचे पंतप्रधान झाले आहेत.10 / 10नेपाळमध्ये राजधानी काठमांडूसह देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत...