1 / 6येत्या ५ जुलैला मोठे काहीतरी घडणार आहे, खासकरून जपान भागातील लोकांमध्ये या दिवसाची मोठी दहशत आहे. कित्येक विमानोड्डाणे रद्द झाली आहेत, पर्यटकांनी बुकिंग रद्द केली आहेत. ऐन जून-जुलैमध्ये जपानमध्ये पर्यटनाचा काळ असतो, परंतू पर्यटकच आलेले नाहीत. आधुनिक जगाची बाबा वेंगा रिया तात्सुकीच्या भविष्यवाणीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. 2 / 6जगातील आजवरची बहुतांश संकटे, भूकंप, त्सुनामी, युद्धे आदी नैसर्गिक आपत्तीच नाही तर इंग्लंडची महाराणीचा मृत्यू आदी अनेक घटनांचे खऱ्या बाबा वेंगाने शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवल्या होत्या. 3 / 6आता रिया तात्सुकी या महिलेने तिला पडणाऱ्या स्वप्नांवरून चित्रे रेखाटून येत्या ५ जुलैला मोठा महाप्रलय येणार असल्याची भविष्यावाणी केली आहे. महत्वाचे म्हणजे तिचे अंदाज खरे ठरले आहेत, यामुळे जपानी लोक नो रिस्क झोनमध्ये गेले आहेत. 4 / 6जपानचे बेट ताकोराच्या अकासुकिजिमामध्ये एका मागोमाग एक असे शेकडो भूकंप नोंदविले गेले आहेत. यामुळे लोक आणखी दहशतीत आहेत. या भुकंपांमुळे तात्सुकीची ही भविष्यवाणी खरी मानून येथील लोक सुरक्षित स्थानी गेले आहेत. 5 / 6२० जूनपासून या बेटावर ७०० हून अधिक भूकंप झाले आहेत. यापैकी ५० हून अधिक भूकंप रिश्टर स्केलवर ३ ते ५ तीव्रतेचे होते. ज्वालामुखी थंड झाल्यानंतर हे बेट बनले आहे. येथील टेकड्या भूकंपाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील मानल्या जातात. सध्या या बेटावर १०० लोक राहत आहेत. 6 / 6रिया तात्सुकी हिने तिला पडलेल्या स्वप्नांवरून चित्रे रंगविली आहेत. त्याचे पुस्तक तिने 1999 मध्ये छापले होते. the future I Saw असे या पुस्तकाचे नाव असून त्यात अनेक प्रकारच्या भविष्यवाणी करण्यात आल्या आहेत. याच पुस्तकात जपानमध्ये ५ जुलैला विध्वंस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.