शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:54 IST

1 / 7
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या वारसाबद्दल नेहमीच गूढ राहिले आहे. मात्र, आता हे गूढ काही प्रमाणात उकलले असून, किम जोंग उन यांची कन्या किम जु आए ही पहिल्यांदाच जगासमोर आली आहे.
2 / 7
किम जु आएने आपल्या वडिलांसोबत एका महत्त्वाच्या लष्करी कार्यक्रमात हजेरी लावली, ज्यामुळे उत्तर कोरियाच्या पुढील सत्तेची सूत्रे तिच्याकडे सोपवली जाणार का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
3 / 7
उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या एका आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणीच्या वेळी किम जु आए आपल्या वडिलांचा हात धरून चालताना दिसली. पांढरा जॅकेट आणि लाल रंगाचे शूज घातलेली ही मुलगी किम जोंग उन यांच्या अत्यंत जवळ असल्याचे फोटोंवरून स्पष्ट होत आहे.
4 / 7
उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी ही छायाचित्रे प्रसिद्ध केली असून, त्यांनी तिला किम यांची 'लाडकी कन्या' असे संबोधले आहे.
5 / 7
दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांच्या मते, किम जोंग उन यांना तीन मुले आहेत, ज्यामध्ये किम जु आए ही दुसऱ्या क्रमांकाची आहे.
6 / 7
यापूर्वी कधीही किम यांच्या मुलांचा फोटो किंवा माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. मात्र, आता थेट क्षेपणास्त्र चाचणीसारख्या धोरणात्मक कार्यक्रमात तिला सोबत घेतल्यामुळे, किम जोंग उन आपल्या मुलीला भविष्यातील 'नेत्या' म्हणून तयार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
7 / 7
किम जोंग उन यांचा वारसदार कोण असेल, यावर गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू होती. काही तज्ज्ञांच्या मते, किम यांची बहीण किम यो जोंग या सत्तेत महत्त्वाच्या होत्या, परंतु आता किम जु आएच्या एन्ट्रीमुळे उत्तर कोरियाच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया