नेतन्याहूंनी ३० वर्षांत मागितली ३ देशांची माफी; हमास नेत्याला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवून वाचवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 20:12 IST
1 / 10युद्धबंदीवर चर्चा करण्यासाठी कतारच्या दोहा येथील एका इमारतीत हमासचे वरिष्ठ नेते जमले होते. बैठक सुरू असतानाच इस्रायली हवाई दलाने लाल समुद्रातून इमारतीला लक्ष्य करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात पाच हमास अधिकारी आणि एक कतारी सैनिक ठार झाला. 2 / 10हल्ल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच ५० हून अधिक मुस्लिम देशांचे नेते दोहामध्ये जमले आणि त्यांनी इस्रायली हल्ल्याचा निषेध केला. या दबामुळे २० दिवसांनंतर नेतन्याहू यांनी कतारच्या पंतप्रधानांना व्हाईट हाऊसमधून फोन करून माफी मागितली. 3 / 10त्याआधी बेंजामिन नेतान्याहू पहिल्यांदाच इस्रायलचे पंतप्रधान बनल्यानंतर लगेचच त्यांनी हमासला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी हमास नेते खालेद मेशाल यांची हत्या करण्यासाठी स्वतः सहा मोसाद एजंट निवडले. मेशाल यांना गुप्तपणे विष देण्याची योजना होती, ज्यामुळे त्यांचा ४८ तासांत मृत्यू झाला असता. 4 / 10ठरल्यानुसार, दोन मोसाद एजंट मेशाल यांच्या घरात घुसले, तर चार जण त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या बाहेर राहिले. एकाने मेशाल यांच्या कानाजवळ विष फवारले. पण एजंट पळून जाताना त्यांना सुरक्षा रक्षकांनी पाहिले आणि त्यांना पकडलं आणि यामागे इस्रायल असल्याचे समोर आलं.5 / 10काही तासांतच मेशाल यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी जर विषावर लवकरच औषध दिले नाही तर त्याचा जीव जाईल असं सांगितले. त्यामुळे जॉर्डनचे राजा हुसेन यांनी इस्रायलला धमकी दिली. विषावर औषध पाठवले नाही तर ते इस्रायलसोबतचा शांतता करार मोडतील आणि विष देणाऱ्या मोसाद एजंटना फाशी देतील.6 / 10यानंतर मोसादचे प्रमुख डॅनी याटोम स्वतः अँटीडोट घेऊन अम्मानला पोहोचले. मेशालला वेळेवर अँटीडोट देण्यात आले आणि त्याचा जीव वाचला. दोन महिन्यांनी, नेतान्याहू जॉर्डनला भेट देऊन राजा हुसेन यांची माफी मागितली. 7 / 10२८ वर्षांनंतर, इस्रायलने पुन्हा खालेद मेशाल यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ९ सप्टेंबर रोजी दोहावरील हल्ल्यादरम्यान हमास प्रमुख खालेद अल-हय्या व्यतिरिक्त, खालेद मेशाल याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा मेशालमुळे नेतन्याहू यांना ओमानची माफी मागावी लागली.8 / 10२००६ मध्ये हमासने संपूर्ण गाझाचा ताबा घेत सैन्य आणि पोलिस दोन्हीवर ताबा मिळवला. यामुळे संतप्त होऊन इस्रायलने गाझावर नाकेबंदी लादली ज्यामुळे अन्न आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला. 9 / 10२०१० मध्ये, गाझाला जहाजांद्वारे मदत पोहोचवण्याचे ठरलं. यात सर्वात मोठे जहाज तुर्किए एमव्ही मावी मारमारा होते, जे ३० मे रोजी गाझासाठ मदत पोहोचवण्यासाठी निघाले होते. त्यात ७४० लोक होते.10 / 10इस्रायलने या जहाजाला मार्ग बदलण्याचा इशारा दिला होता. त्यांनी तसे न केल्याने इस्रायलने त्यावर हल्ला केला. यात सात इस्रायली सैनिकांसह नऊ तुर्की कर्मचारी ठार झाले. यामुळे तुर्की आणि इस्रायलमधील संबंध बिघडले. तीन वर्षांनी, मार्च २०१३ मध्ये, बराक ओबामा यांच्या मध्यस्थीने नेतन्याहू यांनी तुर्कीचे पंतप्रधान रेसेप तय्यिप एर्दोगान यांची माफी मागितली.