बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:10 IST
1 / 7शनिवारी सायंकाळी अमेरिकेहून सहा बी २ बॉम्बर विमाने एकाचवेळी मध्य पूर्वेकडे उडाली होती. तेव्हाच इराणवर मोठा हल्ला होईल असे भाकीत करण्यात आले होते. या विमानांमध्ये मोठा पेलोड होता, त्यामुळे इंधन कमी होते. पॅसिफिक समुद्रावर या विमानांत टँकर विमानांद्वारे इंधन भरण्यात आले. पुढे जे घडले ते भयानक होते. एकूण सात बी२ बॉम्बर विमानांनी १४ बंकर बस्टर बॉम्ब इराणवर टाकले होते. ही विमाने आणि या बॉम्बची दहशत एवढी निर्माण झालीय की अमेरिकेसोबत पंगा घेतला तर काही खरे नाही हे अनेक देशांना वाटू लागले आहे. हे शक्तीशाली लढाऊ विमान बनविण्यात भारतीयाचा महत्वाचा वाटा होता आणि तो आता तुरुंगात आहे. 2 / 7या बी२ बॉम्बर विमानाचा आणि भारताचा संबंध आहे. या विमानाची प्रॉपल्शन सिस्टीम बनविण्यात भारतीय अमेरिकी म्हणजेच अनिवासी भारतीय नागरिकाची महत्वाची भूमिका होती. 3 / 7नोशीर गोवाडिया असे या भारतीयाचे नाव आहे. गोवाडिया हा पेशाने इंजिनिअर आहे. सध्या तो तुरुंगात ३२ वर्षांची शिक्षा भोगत आहे. मुंबईत जन्मलेल्या गोवाडिया याने या विमानासाठी जेव्हा काम केले तेव्हाच त्याने चीनला अमेरिकेची गोपनिय माहिती देखील पुरविली होती. या माहितीवरून चीनने आपल्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा माग अमेरिकेला काढता येऊ नये म्हणून क्रूझ क्षेपणास्त्र एक्झॉस्ट सिस्टम विकसित केली होती. 4 / 7एफबीआयनुसार गोवाडिया याचे आताचे वय ८१ वर्षे आहे. ऑक्टोबर २००५ मध्ये एका तक्रारीच्या आधारे त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. पात्र नसलेल्या व्यक्तीला त्याने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती पुरविली होती. 5 / 7१९६८ ते १९८६ दरम्यान सुमारे २० वर्षे बी२ बॉम्बर्स निर्माण करत असलेल्या टीमसोबत त्याने काम केल्याचे समोर आले होते. या विमानासाठी त्याने यूनिक प्रॉपल्शन सिस्टीम आणि लो ऑब्जर्वेबल कैपेबिलिटीचा विकास केला. १९९७ पर्यंत ते अमेरिकेच्या अशा लढाऊ विमानांच्या निर्मितीवर काम करत होता. 6 / 7यानंतर गोवाडिया याने २००३ ते २००५ या काळात त्यांनी ६ वेळा चीन वारी केली आणि एफबीआयच्या नजरेत आला. चीनमध्ये डिझाइन, चाचणी आणि चाचणी डेटा विश्लेषण आदी कामांद्वारे चीनला मदत केली. तो याकाळात चीनसाठी काम करत होता. परंतू, त्याच्याकडे अमेरिकेचा गोपनिय डेटा होता. तो चीनला सेवा पुरवत असला तरी अमेरिकेसाठी ती गद्दारी होती. कारण चीन तेव्हा स्टील्थी नोजल विकसित करणे आणि क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करत होता. 7 / 7याच्या बदल्यात चीनने त्याला $११०,००० दिले होते. परंतू, एफबीआयच्या चौकशीनंतर २०१० मध्ये त्याला दोषी ठरविण्यात आले आणि २०११ मध्ये त्याला ३२ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. हे त्याचे कृत्य समजल्यावर आपल्या भारत देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला राग येईल. कारण या व्यक्तीमुळेच चीनला ती प्रणाली विकसित करता आली, त्याच जोरावर चीन भारताला डोळे वटारून दाखवत असतो. हा अमेरिकेलाच नाही तर भारतालाही मोठा धक्का होता.