By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:11 IST
1 / 7अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता अशा वळणावर आले आहे जिथे संपूर्ण जगाचे लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढच्या पावलाकडे लागले आहे. आतापर्यंत अमेरिकेने टोमाहॉक क्षेपणास्त्रे आणि 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' सारख्या शस्त्रांनी इराणचे कंबरडे मोडले असले तरी, पेंटागॉनच्या भात्यात अशी काही अस्त्रे अजूनही शिल्लक आहेत ज्यांचा वापर अद्याप करण्यात आलेला नाही. ही शस्त्रे इतकी प्रलयंकारी आहेत की इराणचे सर्वात खोलवर असलेले बंकरही एका झटक्यात उद्ध्वस्त होऊ शकतात.2 / 7हे अमेरिकेचे सर्वात वेगवान क्षेपणास्त्र मानले जाते. ताशी ६००० किलोमीटर वेगाने धावणारे हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारला चकवा देण्यात माहीर आहे. इराणच्या अण्वस्त्र केंद्रांना लक्ष्य करण्यासाठी ट्रम्प हे शस्त्र कधीही बाहेर काढू शकतात.3 / 7हे जमिनीवरून डागले जाणारे हायपरसोनिक शस्त्र आहे. १७०० ते ३५०० किमीची पल्ला गाठण्याची क्षमता असलेले हे शस्त्र ट्रकवरूनही डागता येते. ही क्षेपणास्त्रे प्रामुख्याने रशिया किंवा चीनसाठी राखून ठेवली होती, पण आता इराणच्या वाढत्या आक्रमकतेमुळे अमेरिकेचा हा 'ईगल' हल्ला करण्यासाठी सज्ज झाला आहे.4 / 7ही एक अत्यंत स्वस्त पण तितकीच घातक यंत्रणा आहे. यामुळे अमेरिकेचे साधे मालवाहू विमान (Cargo Plane) एका फिरत्या क्षेपणास्त्र तळाचे रूप घेऊ शकते. एकाच वेळी शेकडो क्षेपणास्त्रे डागून इराणच्या हवाई संरक्षण दलाला गोंधळात टाकण्यासाठी हे 'ब्रह्मास्त्र' ठरू शकते.5 / 7इराणने आपली अनेक महत्त्वाची केंद्रे जमिनीखाली शेकडो फूट खोल बांधली आहेत. पण अमेरिकेचा GBU-72 हा नवीन बंकर बस्टर बॉम्ब या केंद्रांना मातीमोल करण्यासाठीच बनवला गेला आहे.6 / 7जरी अमेरिकेने अद्याप अण्वस्त्रांच्या वापराचे कोणतेही संकेत दिले नसले तरी, ट्रम्प यांच्या धोरणांनुसार इराणला अण्वस्त्रधारी होण्यापासून रोखण्यासाठी हा 'शेवटचा पर्याय' म्हणून कायमच खुला आहे.7 / 7ट्रम्प यांनी दिलेला ४८ तासांचा अल्टिमेटम संपत असताना, अमेरिका आपल्या या राखीव शस्त्रांचा वापर करणार की युद्धविरामाकडे वळणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.