By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:05 IST
1 / 8मध्येपूर्वेत भडकलेले अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध सध्यातरी थांबण्याचे चित्र दिसत नाही. या युद्धाची धग दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. दरम्यान इराणने अमेरिकेचा १५ कलमी शांतता प्रस्ताव फेटाळून लावला आणि त्या ऐवजी आपला १० कलमी प्रतिप्रस्ताव दिला. 2 / 8यातच, इराण युद्धात युद्धविराम प्रस्ताव हे एक महत्वााचे पाऊल आहे. मात्र संघर्ष संपवण्यासाठी तो पुरेसा नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, इराणने आपल्या प्रस्तावात, होर्मुजमधून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून २० लाख डॉलर एवढा प्रचंड टॅक्स घेण्याची अटही ठेवली आहे.3 / 8इराणच्या प्रस्तावातील १० मुख्य अटी - न्यूज एजन्सी 'IRNA' नुसार, इराणने सादर केलेल्या प्रस्तावात, प्रादेशिक संघर्ष संपवणे, तात्पुरत्या सीझफायरऐवजी युद्ध कायमस्वरूपी थांबवणे, होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे, होर्मुजमधून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून २० लाख डॉलर एवढा टॅक्स घेण्याची अट, न्युयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही रक्कम टॅक्स ओमानसोबत वाटून घेतली जाईल, या महत्वाच्या अटी आहेत.4 / 8याशिवाय, या निधीचा वापर हल्ल्यात झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्निर्माणासाठी केला जाईल, अण्वस्त्र प्रसारबंदी करारांतर्गत (NPT) युरेनियम समृद्धीकरणाच्या अधिकाराला औपचारिक मान्यता देणे, अमेरिका आणि इतर देशांनी लादलेले निर्बंध हटवणे, लेबनॉनमधील हिजबुल्लावरील इस्रायली हल्ले थांबवणे, आदी अटींचा समावेश आहे.5 / 8महत्वाचे म्हणजे, थेट नुकसान भरपाई मागण्याऐवजी, हा पैसा अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी वापरला जाईल, असे या प्रस्तावात म्हमण्यात आले आहे.6 / 8ट्रम्प आक्रमक - दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा विनाशाचा इशारा दिला आहे. 'इराणला एका रात्रीत संपवले जाऊ शकते आणि ती रात्र उद्याची असू शकते,' असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. जर कोणताही करार झाला नाही, तर बुधवार मध्यरात्रीपर्यंत इराणचे सर्व पूल आणि वीज प्रकल्प उद्ध्वस्त केले जातील, अशी धमकी त्यांनी दिली आहे. 7 / 8तत्पूर्वी, अमेरिकेने पाकिस्तानतर्फे पाठवलेला प्रस्ताव इराणने 'अवास्तव' असल्याचे म्हणत, फेटाळला आहे. त्यामुळे आता हा संघर्ष कोणत्या वळणावर जातो हे बघावे लागेल.8 / 8iran war