शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेला प्रत्युत्तर! उत्तर कोरियाच्या मदतीने अण्वस्त्र तयार करतोय इराण

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 21, 2020 7:53 PM

1 / 10
इराण उत्तर कोरियाच्या मदतीने अण्वस्त्र तयार करत आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे.
2 / 10
अमेरिकेतील एका एक वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की या वर्षाच्या अखेरपर्यंत इराणजवळ अण्वस्त्र तयार करण्यासाठी मुबलक सामग्री पोहोचू शकते. मात्र, इराण अण्वस्त्र तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अधिकृतपणे नाकारतो.
3 / 10
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इराण उत्तर कोरियाच्या साथीने लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र तयार करण्याच्या कामाला लागला आहे. उत्तर कोरिया इराणला अण्वस्त्र तयार करण्यासाठी आवश्यक असणारे महत्वाचे साहित्य पुरवणार आहे.
4 / 10
या दोन्ही देशांनी अण्वस्त्र तयार करण्याच्या कामाला नेमकी केव्हापासून सुरुवात केली, यासंदर्भात अमेरिकेने माहिती दिलेली नाही.
5 / 10
अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की 2015ला करार झाला असतानाही, इराणचा अण्वस्त्र मिळवण्याचा प्रयत्न आहे. या करारात, इराणने अणू कार्यक्रम थांबवल्यास त्याला जागतीक बाजारपेठेत प्रवेश दिला जाईल, असे ठरले होते. पण, डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 मध्ये हा करार रद्द करून इराणवर निर्बंध लादले होते.
6 / 10
अमेरिकेने याच वर्षी जानेवारी महिन्या एअर स्ट्राईक करून इराणचा मिलिट्री जनरल कासिम सुलेमानीची हत्या केली होती.
7 / 10
सुलेमानीच्या हत्येपासूनच इराण आणि अमेरिकेचे संबंध अधिक ताणले गेले आहेत. एवढेच नाही, तर सुलेमानीच्या हत्येचा बदला घेतला जाईल असेही इराणने म्हटले होते.
8 / 10
अमेरिकेने इराणवर काही नवे निर्बंध लादण्याचीही घोषणा केली आहे. इराणच्या न्यूक्लिअर, मिसाईल आणि पारंपरिक शस्त्रास्त्र योजनेशी संबंधित दोन डझनवर अधिकारी आणि संस्थांवर अमेरिका याच आठवड्यात बंदी घालत आहे.
9 / 10
संयुक्त राष्ट्रात इराणी मिशनचे प्रवक्ता अलीरेजा मिरिउसेफी यांनी अमेरिकेकडून लावल्या जात असलेल्या या निर्बंधांना प्रपोगंडा असल्याचे म्हटले आहे.
10 / 10
या निर्णयामुळे अमेरिका आणखी वेगळा पडेल, असेही अलीरेजा यांनी म्हटले आहे.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाnorth koreaउत्तर कोरियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKim Jong Unकिम जोंग उन