By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 16:22 IST
1 / 10लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढत असताना चीनची सरकारी मीडिया ग्लोबल टाइम्सने भारताविरोधात मानसिकपद्धतीने युद्ध पुकारलं आहे. 2 / 10पहाडी परिसरात युद्ध अभ्यास आणि टँकचे व्हिडीओ जारी केल्यानंतर आता ग्लोबल टाइम्सने अत्याधुनिक तोफांची धमकी दिली आहे.3 / 10ग्लोबल टाइम्सने दावा केला आहे की, चीनच्या सैन्यांनी पीएलएने भारतासोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाची सर्वाधिक आधुनिक तोफ PCL 181 ला लडाखच्या सीमेवर तैनात केले आहे4 / 10या अत्याधुनिक तोफेला अलीकडेच चीनच्या सैन्यात सामील केले आहे. पीएलए ७५ वी ग्रुप आर्मीतंर्गत दक्षिण सीमेवर आयोजित कार्यक्रमात अनेक नवी हत्यारे समाविष्ट करुन घेतली आहे असं ग्लोबल टाईम्सने सांगितले आहे. 5 / 10तसेच वीकलवर चालणारी ही तोफ १५५ एमएमची आहे, पहिल्यांदा १ ऑक्टोबर २०१९ मध्ये नॅशनल डेच्या दिवशी सैन्याच्या परेडमध्ये हिचा समावेश केला होता. या तोफेचे वजन २५ टन इतकं आहे.6 / 10ही स्वयंचलित तोफ सहजरित्या खूप वेळ कुठेही घेऊन जाऊ शकतो, यापूर्वी या तोफेचे वजन ४० टन होते, कमी वजनाची तोफ असल्याने डोंगराळ भागात कितीची उंचापर्यंत नेता येते, ज्याठिकाणी ऑक्सिजनदेखील कमी आहे. 7 / 10कमी ऑक्सिजनमुळे तिची इंजिन क्षमतेवर परिणाम होतो, चीनने २०१७ मध्ये डोकलाम विवादानंतर पीसीएल १८१ तैनात केलं होतं असं दावा ग्लोबल टाइम्सने केला आहे. त्यामुळे सीमेवर शांती स्थापन करणे सोपं गेले. 8 / 10भारत आणि चीन यांच्यात सध्या तणाव आहे. दोन्ही देशांच्या सैन्याकडून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार पीसीएल १८१ तोफांच्या तैनातीनंतर भारत आणि चीन यांच्यात सकारात्मक चर्चेची सुरुवात झाली आहे.9 / 10चायना सेंट्रल टेलीविजनने सांगितले की, हुबेई प्रांतात सुरुवातीला कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला, सध्या तो नियंत्रणात आला आहे, त्यामुळे चीन सैन्य युद्ध अभ्यास करत आहेत. चीनी सैन्यानी युद्ध सरावावेळी अनेक वाहनं, टँक, तोफ आणि मिसाइल एका स्थानावरुन दुसऱ्या ठिकाणी तैनात केले आहेत. 10 / 10चीनी सैन्य १ जून रोजी तिबेटच्या उंचावर असणाऱ्या परिसरात मध्यरात्री युद्धसराव करत होती, चीनी आर्मीच्या तिबेट कमांडने सोमवारी रात्री ४ हजार ७०० मीटर उंचीवर जवान पाठवून कठीण परिस्थितीत स्वत:ची क्षमता ओळखण्यासाठी अभ्यास केला.