शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चंदन नाही तर हे आहे जगातील सर्वात महाग लाकूड, १ किलोसाठी मोजावे लागतात ८ लाख रुपये, अशी आहे वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 15:33 IST

1 / 5
जगातील सर्वात महाग लाकूड कुठलं असेल, याबाबत तुम्ही कधी विचार केलाय. भारतामध्ये तर महागडं लाकूड म्हटलं की चंदनाचं लाकूड नजरेसमोर येतं. मात्र आज आपण जगातील सर्वात महागड्या लाकडाविषयी जाणून घेऊयात. हे लाकूड कुठलं आहे आणि कुठे सापडतं. त्याचं नाव काय याबाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे.
2 / 5
या लाकडाला जगभरात आफ्रिकन ब्लॅकवूड या नावाने ओळखलं जातं. आफ्रिकन ब्लॅकवूडची झाडं ही केवळ २६ देशात सापडतात. मात्र त्यांचे मूळ स्थान हे आफ्रिका खंडातील मध्य आणि दक्षिण भागात आहे. तिथे ही झाडं मोठ्या प्रमाणात आढळतात. या झाडांची उंची २५-४० फुटांपर्यंत असते. या झाडांचं लाकूड एवढं महाग आहे की, त्याच्या एक किलो लाकडासाठी ७ ते ८ लाख रुपये मोजावे लागतात.
3 / 5
मात्र आता आफ्रिकन ब्लॅकवूडच्या झाडांची संख्या कमी होत चालली आहे. याचं एड झाड उगवण्यासाठी ६० वर्षे लागतात. आफ्रिकन ब्लॅकवूडच्या महागड्या किमतीचा त्याला असलेल्या मागणीवर काहीही परिणाम झालेला नाही. एकेकाळी या लाकडापासून माचिससुद्धा बनवली जायची. मात्र आता महागडे फर्निचर आणि वाद्ययंत्रंच बनवली जातात.
4 / 5
महागड्या फर्निचरशिवाय या लाकडापासून सनई, बासरी आणि इतर काही वाद्ये बनवली जातात. आफ्रिकन ब्लॅकवूडचे वृक्ष आफ्रिकेतील दुष्काळी भागातच सापडतात.
5 / 5
रिपोर्ट्सनुसार केनिया आणि टंझानियासारख्या देशांमध्ये या काळ्या लाकडाच्या तस्करीच्या अनेक घटना समोर येत असतात. अनेक तस्कर रातोरात ही झाडे कापून घेऊन जातात.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयforestजंगल