हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:47 IST
1 / 6सध्या संपूर्ण जगात एका चिनी जोडप्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण आहे या दोघांची प्रचंड संपत्ती. हे जोडपे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे, २६ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालकाची मुलगी गाओ हैचुन ही एका चहावाल्याशी लग्न करणार आहे. 2 / 6झांग जुंजी हा चायनीज टी चेन कंपनी चाईजीचा अब्जाधीश संस्थापक आहे. गाओ हैचुन आणि झांग जुंजी या दोघांचीही संपत्ती अब्जावधींमध्ये आहे. त्यांच्या लग्नाच्या वृत्ताने चीनच्या व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.3 / 6वधू: गाओ हैचुन या चीनमधील मोठी सोलर एनर्जी कंपनी 'ट्रिना सोलर' चे संस्थापक गाओ जिफान यांची मुलगी आहे. गाओ जिफान यांची एकूण संपत्ती अंदाजे $३.१ अब्ज एवढी आहे. गाओ हैचुन स्वतः 'ट्रिना सोलर'च्या सह-अध्यक्ष आहेत.4 / 6वर: झांग जुंजी हे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध असलेल्या 'चाईजी' या लोकप्रिय चायनीज टी चेन कंपनीचे मालक आहेत. चाईजी ही चीनमधील तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय 'न्यू चाय' ब्रँड आहे. जुंजी यांना अनेकजण 'चायवाला अब्जाधीश' म्हणूनही ओळखतात.5 / 6ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या दोन्ही 'टायकून' कुटुंबातील सदस्यांची भेट एका व्यावसायिक कार्यक्रमादरम्यान झाली. दोघांचेही वय अंदाजे ३० वर्षांच्या आसपास आहे आणि त्यांनी लग्नासाठी नोंदणी केली आहे.6 / 6 ट्रिना सोलर कंपनीच्या प्रवक्त्याने लवकरच दोघांचे लग्न होणार असल्याची माहिती दिली आहे, मात्र लग्नाची निश्चित तारीख अजून जाहीर केलेली नाही.