१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:30 IST
1 / 6 आफ्रिकेतील छोट्या पण प्रसिद्ध देश इस्वातिनी (पूर्वीचे नाव स्वाझिलँड) चे राजा मस्वाती तृतीय पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. ते त्यांच्या ऐशोआरामी आणि विलासी जीवनशैलीसाठी ओळखले जातात, परंतु या वेळेस चर्चेचे कारण त्यांच्या १५ पत्नी, ३० मुले आणि शेकडो नोकरांचा ताफा आहे..!2 / 6 सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मस्वाती तृतीय आपल्या १५ पत्नी, ३० मुले आणि सुमारे १०० नोकरांसह दिसत आहेत. हा व्हिडिओ त्यांच्या युएई (संयुक्त अरब अमिराती) दौऱ्याचा आहे. पहिल्यांदा हा व्हिडिओ जुलै महिन्यात समोर आला होता, ज्यात अबू धाबी विमानतळावर त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे भव्य स्वागत करण्यात आले होते.3 / 6 व्हिडिओमध्ये मस्वाती तृतीय आपल्या प्रायव्हेट जेटमधून पारंपरिक वेशात उतरतानाचे दृश्य आहे. त्यांच्या मागे महिलांचा एक मोठा समूह दिसतो. सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'स्वाझिलँडचे राजा आपल्या १५ पत्नी आणि १०० नोकरांसह अबू धाबीला पोहोचले. त्यांच्या वडिलांनी(राजा सोभुजा दुसरे) तर १२५ विवाह केले होते.'4 / 6 गरीब देशाचे श्रीमंत राजे...राजा मस्वाती तृतीय यांच्या या शाही थाटावर अनेकदा टीका झाली आहे. याचे कारण म्हणजे, इस्वातिनी हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स टीका करत आहे की, “राजा प्रायव्हेट जेटमध्ये फिरतो, पण देशातील लोकांकडे वीजसुद्धा नाही.” “हा माणूस विलासी जीवन जगतो आणि जनतेला अन्नही मिळत नाही.”5 / 6 दरवर्षी नवी पत्नी...राजा मस्वाती तृतीय १९८६ पासून सत्तेवर आहेत आणि त्यांची संपत्ती सुमारे १ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या ताब्यात अनेक आलिशान महाल, महागड्या कार आणि खासगी जेट आहेत.6 / 6 विशेष म्हणजे, राजा दरवर्षी आयोजित होणाऱ्या ‘रीड डान्स’ (Reed Dance) या पारंपरिक उत्सवात नवीन पत्नीची निवड करतात. ही परंपरा इस्वातिनीमध्ये शतकानुशतके चालत आलेली आहे. पण, आता त्यावर जागतिक स्तरावर मोठी टीका होत आहे.