Economy Crisis: या पाच देशांत श्रीलंकेसारखी परिस्थिती, अर्थव्यवस्थेचे दिवाळे, भीषण आर्थिक संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 05:49 PM2022-07-20T17:49:14+5:302022-07-20T17:51:56+5:30

Economy Crisis: जगातील अनेक अर्थव्यवस्था सध्या संकटातून जात आहेत. त्यात आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत ओढवलेल्या परिस्थितीने सर्वांची चिंता वाढवली आहे. दरम्यान, जगातील पाच देशांमध्ये श्रीलंकेसारखीच परिस्थिती ओढवली आहे. या देशांमधील अर्थव्यवस्था संकटात असून तिथे मोठं आर्थिक संकट येऊत तिथे श्रीलंकेसारखीच अंदाधुंदी माजण्याची शक्यता आहे.

जगातील अनेक अर्थव्यवस्था सध्या संकटातून जात आहेत. त्यात आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत ओढवलेल्या परिस्थितीने सर्वांची चिंता वाढवली आहे. दरम्यान, जगातील पाच देशांमध्ये श्रीलंकेसारखीच परिस्थिती ओढवली आहे. या देशांमधील अर्थव्यवस्था संकटात असून तिथे मोठं आर्थिक संकट येऊत तिथे श्रीलंकेसारखीच अंदाधुंदी माजण्याची शक्यता आहे.

या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आपला शेजारील देश असलेला पाकिस्तान. भारताचा हा शेजारील देश संकटात असलेल्या पाकिस्तानने गेल्या आठवड्यात आपल्या कर्जाच्या प्रोग्रॅमला पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत एका कराराला अंतिम रूप दिले आहे. श्रीलंकेप्रमाणेच चीनवर असलेलं अवलंबित्व पाकिस्तानला महागात पडत आहे. तसेच पाकिस्तानकडील परकीय गंगाजळी घटून केवळ ९.८ अब्ज डॉलर एवढीच उरली आहे.

भारताचा अजून एक शेजारी देश असलेला नेपाळही अन्न आणि तेलासारख्या आवश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. देशाकडील परकीय चलन संपुष्टात आले आहे. तसेच भरण्यामध्ये असंतुलन वाढले असते. तसेच नेपाळमधून होणारी आयात ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

इथिओपियाचीही आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. इथिओपियाला त्याच्या डोक्यावरील मोठ्या प्रमाणातील कर्जाची परतफेड करायची आहे. तसेच अर्थव्यवस्थेला कोविडपूर्व परिस्थितीत आणण्याचे आव्हान आहे. त्यातच २०२० मध्ये झालेल्या अंतर्गत यादवीने अब्जावधी डॉलरचं नुकसान केलं आहे.

२०२१ च्या आकड्यांच्या आधारावर जागतिक बँकेने हल्लीच नायजेरियाला जगातील सर्वात वाईट महागाई दर असलेल्या देशात समाविष्ट केले होते. आयएमएफच्या मॅनेजिंग डायरेक्टर क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई, क्रज आणि फूड क्रायसिसने या देशाच्या अर्थव्यवस्थेला पतनाच्या दिशेने नेले आहे.

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार इजिप्तला पुढील पाच वर्षांत १०० अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफोड करायची आहे. त्यात २०२४ मधील ३.३ अब्ज डॉलरच्या एका बाँडचाही समावेश आहे.