शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : 'या' देशात लॉकडाउनचे नियम पाळले नाही तर होतेय हत्या, सरकारही हतबल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 1:07 AM

1 / 12
जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. यामुळे बहुतांश देशांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. अनेक देशांवर तर लॉकडाउन उठवल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. एका देशात तर लॉकडाउनच्या नियमांचे पालन केले नाही, तर चक्क हत्या केल्या जातायत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या देशाचे सरकारही या हत्या रोखण्यात अयशस्वी ठरत आहे.
2 / 12
या देशाचे नाव आहे कोलंबिया (Colombia). येथे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाच येथील ड्रग माफियांनीही आपला वेगळा लॉकडाउन घोषित केला आहे. जो या लॉकडाउनचे पालन करत नाही, त्याची ड्रग माफिया हत्या करत आहेत. आतापर्यंत येथे तब्बल आठ लोकांची हत्या करण्यात आली आहे.
3 / 12
द गार्डियनने प्रसिद्ध झालेल्या ह्यूमन राइट वॉचच्या रिपोर्टनुसार, शस्त्रधारी ड्रग माफियांचे गट व्हाट्सअॅप आणि पत्रकांच्या माध्यमाने लोकांना लॉकडाउनच्या नियमांचे सक्तीने पालन करण्यास सांगत आहेत. यातील काही ड्रग माफिया तर 50 वर्षांपेक्षाही अधिक जुने आहेत.
4 / 12
द गार्डियनने प्रसिद्ध झालेल्या ह्यूमन राइट वॉचच्या रिपोर्टनुसार, शस्त्रधारी ड्रग माफियांचे गट व्हाट्सअॅप आणि पत्रकांच्या माध्यमाने लोकांना लॉकडाउनच्या नियमांचे सक्तीने पालन करण्यास सांगत आहेत. यातील काही ड्रग माफिया तर 50 वर्षांपेक्षाही अधिक जुने आहेत.
5 / 12
हे ड्रग माफिया ग्रामिण भागातील लोकांवर अधिक अत्याचार करत आहेत. सर्वात वाईट स्थिती टुमाको (Tumaco) शहराची आहे. येथील एका बंदराहून सातत्याने पोलीस आणि माफियांच्या हिंसक झटापटीच्या बातम्या येत असतात.
6 / 12
कुणीही नदीवर मासे पकडण्यासाठी जाणार नाही, सायंकाळी 5 वाजल्यानंतर कुठलेही दुकान अथवा बाजार सुरू राहणार नाही, तसेच बाहेर ठेला लावणेही चालणार नाही. असे दिसून आलेच, तर कसल्याही प्रकारची चौकशी न करता गोळी घालण्यात येईल, अशी धमकी ड्रग माफियांनी टुमाको (Tumaco) शहरातीन नागरिकांना दिली आहे.
7 / 12
हे ड्रग माफिया आणि त्यांच्या छोट-छोट्या गटांतील लोक संपूर्ण देशात सामान्य नागरिकांना धमकावत आहेत. कॉका आणि गुआविअरे प्रांतांत तर या शस्त्रधारी गटांनी, जे लोक त्यांचे ऐकत नाहीत, त्यांच्या दुचाकी आणि गाड्या जाळल्या आहेत.
8 / 12
ड्रग माफियांनी गावे आणि शहरांत सर्व प्रकारची ये-जा बंद केली आहे. एवढेच नाही, तर कुणाला कोरोना व्हायरस अल्याचा संशय जरी आला, तरी हे लोक त्याला गोळ्या घालून मारून टाकत आहेत.
9 / 12
कोलंबिया सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली आहे. येथे आतापर्यंत एकूण 1.60 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 5 हजार 625 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. येथे रोज 5 हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत.
10 / 12
या शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या ड्रग माफियांचा लॉकडाउन हा सरकारी लॉकडाउनपेक्षाही कडक आहे. यांचा एकच कायदा आहे, त्यांनी घातलेले लॉकडाउनचे नियम जो मोडेल, त्याला सरळ स्मशानात पाठवणे.
11 / 12
कोलंबियामध्ये पाच दशकांपासून चालत आलेले गृहयुद्ध 2016 मध्ये संपले. या गृहयुद्धात तब्बल 2.60 लाख हून अधिक लोक मारले गेले. तर, 70 लाखहून अधिक लोक विस्थापित झाले होते.
12 / 12
2016 मध्ये कोलंबियातील सरकार आणि रिव्होल्यूशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया यांच्यात करार झाला होता. यानंतर देशात शांतता प्रस्थापित झाली होती.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याColombiaकोलंबियाmafiaमाफियाDrugsअमली पदार्थGovernmentसरकार