निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:47 IST
1 / 9अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २७ वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सिडनी स्वीनीचे हिचे कौतुक केले आहे. याचे कारण म्हणजे सीडनी स्वीनीची अमेरिकन ईगल या जीन्स ब्रँडसाठी केलेली नवीन जाहिरात.2 / 9ही जाहिरात लाँच होताच व्हायरल झाली. पण सोशल मीडिया मात्र या जाहिरातीनंतर नेटकरी दोन गटांत विभागलेले दिसले. सोशल मीडियावर काहींनी या जाहिरातीला थेट वंशवादाशी जोडत तीव्र नाराजी व्यक्त केली.3 / 9जाहिरातीवरून टीका होत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र उघडपणे स्वीनीचे समर्थन केले. जाणून घेऊया, या जाहिरातीतील अशी कोणती गोष्ट आहे, ज्यामुळे इतका वाद पेटला आहे आणि ट्रम्प यांना त्यात काय रस आहे.4 / 9सिडनीचे डोळे निळेशार आहेत. २३ जुलैला अमेरिकन ईगलने सिडनी स्वीनीसोबत एक नवीन जीन्स जाहिरात लाँच केली, ज्यामध्ये ती म्हणते, 'जीन्स (Genes) हे पालकांकडून पुढल्या पिढीत येतात, माझी जीन्स (Jeans) निळी आहे.'5 / 9जाहिराताचा अर्थ असा की, शारिरिक गुणधर्म हे पालकांकडून मुलांकडे येतात, ज्यामुळे पुढल्या पिढीच्या केसांचा रंग, व्यक्तिमत्व आणि अगदी डोळ्यांचा रंग यासारखे गुणधर्म निश्चित होतात. असे म्हणून ती डोळ्याचा निळा रंग आणि जीन्सचा रंग समान असल्याचे सांगतेय.6 / 9त्यानंतर जाहिरातीत दाखवलेले घोषवाक्य असे आहे की, 'सिडनी स्वीनीकडे उत्तम जीन्स आहेत!' (“Sydney Sweeney has great jeans). काही लोकांना हा शाब्दिक खेळ पटलेला नाही. हा सौंदर्याच्या मानकांवरून भेदभाव असल्याचे त्यांचे मत आहे.7 / 9मिळालेल्या वृत्तानुसार, सिडनी स्वीनी २०२४ पासून फ्लोरिडामध्ये नोंदणीकृत रिपब्लिकन आहे, परंतु तिने स्वतः कधीही तिच्या राजकीय विचारसरणीवर सार्वजनिकपणे भाष्य केलेले नाही. ट्रम्पचा सिडनीला पाठिंबा या एका कारणामुळे आहे.8 / 9ट्रम्पने ट्रुथ सोशलवर पोस्ट केले की सिडनी स्वीनीची जाहिरात सर्वात 'हॉट' लोकप्रिय आहे आणि तिला पाठिंबा मिळाला पाहिजे. ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना असेही म्हणाले की, जर सिडनी स्वीनी रिपब्लिकन असेल तर मला तिची जाहिरात खूप छान वाटली.9 / 9कंपनीने या वादावर उत्तर देताना म्हटले की आमची जाहिरात फक्त जीन्स पँट पुरती मर्यादित आहे. ब्रँडने स्पष्ट केले की त्यात कोणताही राजकीय किंवा वांशिक संदर्भ नाही, केवळ सिडनी आणि तिच्या फॅशन स्टाईलबद्दल ही जाहिरात आहे.