शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 16:18 IST

1 / 13
कोरोना व्हायरस व्हॅक्‍सीनवर आज दोन मोठ्या बातम्या आहेत. रशियाच्या डिफेन्स मिनिस्‍ट्रीने तयार केलेली व्हॅक्सीन ट्रायलच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. ही व्हॅक्‍सीन ज्यांना देण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोना व्हायरसविरोधी इम्‍यूनिटी डेव्हलप होत असल्याचे दिसत आहे.
2 / 13
तर दुसरीकडे, चीनच्या झिफेईने आपल्या कोरोना व्हॅक्‍सीनची दुसऱ्या टप्प्यावरी ट्रायल सुरू केली आहे. या कंपनीने तीन आठवड्यांपूर्वीच क्लिनिकल ट्रायलला सुरुवात केली आहे.
3 / 13
चीन, इतर देशांच्या तुलनेत व्यापक स्तरावर कोरोना व्हॅक्‍सीन तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील 19 लिडिंग प्रोग्राम्‍सपैकी 6 मध्ये चीनची सक्रिय भागीदारी आहे.
4 / 13
भारतात केव्हापर्यंत येणार कोरोना व्हॅक्सीन? - जगभरातील वैज्ञानिक कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी दिवस रात्र एक करत आहे. भारतातही दोन व्हॅक्सीन तयार करण्यात आल्या आहेत. भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) Covaxin नावाने व्हॅक्सीन तयार केली आहे. तर Zydus Cadila नेही एक व्हॅक्सीन तयार केली आहे. या दोन्ही व्हॅक्‍सीनला ह्यूमन क्लिनिकल परीक्षणाची परवानगी मिळाली आहे.
5 / 13
Covaxinच्या ट्रायलसाठी एनरोलमेन्ट सुरू - इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इंस्‍टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी आणि भारत बायोटेकने एकत्रितपणे तयार केलेल्या COVAXIN ला क्लिनिकल ट्रायलची मंजुरी मिळाल्यानंतर, सध्या व्हॉलंटियर्स एनरोलमेन्ट सुरू आहे. तसेच ट्रायलपूर्वी व्हॅक्‍सीनच्या बॅचची टेस्टिंग सीडीएल कसौली येथे सुरू आहे.
6 / 13
चिनी कंपनीने पहिल्या टप्प्यावरील टेस्टिंगची माहिती दिली नाही - चिनी फार्मा कंपनी Zhifei ने व्हॅक्‍सीनच्या दुसऱ्या ट्प्प्यावरील ट्रायलला सुरुवात केली आहे. कंपनीने म्हटले होते, की पहिल्या टप्प्यावरील ट्रायल 21 जुलैपर्यंत संपेल. त्यांनी अद्याप पहिल्या टप्प्यावरील ट्रायलसंदर्भात अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.
7 / 13
चीनमध्ये एकूण 8 व्हॅक्‍सीनची मानवावर ट्रायल सुरू आहे. Zhifei कंपनीची व्हॅक्‍सीन ही यापैकीच एक आहे.
8 / 13
रशियन व्हॅक्‍सीन प्रभावी, काहीही साइड इफेक्ट नाही - रशियन डिफेन्स मिनिस्‍ट्रीने तयार केलेली व्हॅक्‍सीन क्लिनिकल ट्रायलच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना ही व्हॅक्‍सीन देण्यात आली, त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास नाही. तसेच, व्हॅक्‍सीनमुळे कसल्याही प्रकारचा साइड इफेक्‍टदेखील दिसून आलेला नाही.
9 / 13
ही व्हॅक्सीन ज्या व्हॅलंटियर्सना देण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोनाविरोधातील इम्‍यूनिटी डेव्हलप होताना दिसत आहे. प्रोटोकॉल्सनुसार या व्हॉलंटियर्सची नियमितपणे अँटीबॉडी टेस्‍ट करण्यात येत आहे.
10 / 13
Moderna ने ROVI सोबत केला करार - अमेरिकेतील दिग्‍गज फार्मा कंपनी Moderna ने युरोपातील ROVI कंपनीसोबत करार केला आहे. हा करार मोठ्या प्रमाणावर व्हॅक्‍सीनचे प्रोडक्शन आणि डिस्‍ट्रीब्‍यूशनसाठी करण्यात आला आहे.
11 / 13
ROVI वॉयल फिलिंग आणि पॅकेजिंग उपलब्‍ध करून देणार आहे. Moderna ने mRNA-1273 नावाने व्हॅक्‍सीन तयार केली आहे. या व्हॅक्‍सीनची दुसऱ्या टप्प्यावरील ट्रायल लवकरच सुरू होणार आहे.
12 / 13
पुढील वर्षापर्यंत दोन बिलियन डोस तयार करण्यावर WHO चा जोर - वर्ल्‍ड हेल्‍थ ऑर्गनायझेशनने 2021 पर्यंत कोरोना व्हॅक्‍सीनचे 2 बिलियन डोस तयार करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. भारत जगातील एकूण व्हॅक्‍सीन आवश्यकतेच्या 60 टक्के पुरवठा करतो. यामुळे या सर्व प्रक्रियेत भारताची भूमिका अत्यंत महत्वाची राहणार आहे.
13 / 13
पंतप्रधान मोदींनीही म्हटले आहे, की भारत व्हॅक्‍सीन डेव्हलपमेन्ट आणि डिस्‍ट्रिब्‍यूशनमध्ये मोठी जबाबदारी पार पाडायला तयार आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतrussiaरशियाchinaचीनdocterडॉक्टरAmericaअमेरिकाmedicinesऔषधंmedicineऔषधं