शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चिंता वाढली! कोरोनाच्या नवा स्ट्रेनचा तरुणांना सर्वाधिक धोका, रिसर्चमधून धडकी भरवणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 2:57 PM

1 / 12
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. देशभरातील कोरोना संसर्गाचा वेग थोडा मंदावत असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनामुळे चिंता वाढली आहे.
2 / 12
कोरोना व्हायरसच्या या नवीन प्रकाराने आता जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली असून, भारतातही कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले काही रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
3 / 12
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,03,40,470 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,49,649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
4 / 12
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,505 नवे रुग्ण आढळले आले असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता संशोधनातून कोरोनाच्या नवा स्ट्रेनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
5 / 12
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा नवा स्ट्रेन तरुणांमध्ये अत्यंत वेगाने पसरत आहे. इम्पीरियल कॉलेज लंडनने (Imperial College London) केलेल्या रिसर्चमधून ही धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
6 / 12
नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन खूप वेगात पसरल्याचंही संशोधनातून समोर आलं आहे. ब्रिटनमध्ये जवळपास तीनपट ही नवीन प्रकरणं वाढली आहेत असा खुलासा रिसर्चमधून करण्यात आला आहे.
7 / 12
संशोधकांच्या मते, केवळ 20 वर्षांखालील लोकांनाच नव्हे तर इतर वयोगटातील लोकांनाही या नव्या व्हायरसची वेगाने लागण होत आहे. इम्पीरियल कॉलेजने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनमधील सर्व शाळा सुरू असताना संबंधित डेटा गोळा केला होता.
8 / 12
नव्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ख्रिसमसनंतर शाळा बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय हा आता ब्रिटनने घेतला आहे. 11 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
9 / 12
सध्या ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 9 लाख 40 हजार पेक्षा अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
10 / 12
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्रेजेनेका कोविशिल्ड आणि फायझर या लसी याठिकाणी दिल्या जात आहेत. याबाबत सकारात्मक बातमी अशी की, ही लस नव्या कोरोना स्ट्रेनवरही प्रभावी ठरत असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
11 / 12
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनवर भारताने नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
12 / 12
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ब्रिटनहून परतलेल्या एका कुटुंबातील सदस्यांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबातील 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये देखील कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसResearchसंशोधन