शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोणतीही लस कोरोनाला पूर्णपणे रोखू शकत नाही, WHO प्रमुखांच्या विधानाने चिंतेत भर

By सायली शिर्के | Published: November 17, 2020 11:04 AM

1 / 14
जगभरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांची संख्या तब्बल पाच कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना लसीवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे.
2 / 14
कोरोना व्हायरसवर जगभरात संशोधन सुरू असून लसीच्या चाचणीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठं विधान केलं आहे.
3 / 14
कोणतीही लस कोरोनावर पूर्णपणे मात करू शकत नाही असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. WHO प्रमुखांनी कोरोना लसीसंदर्भात केलेल्या विधानामुळे चिंतेत भर पडली आहे.
4 / 14
'जगात कोरोनावर कोणतीही लस तयार केली गेली तरी ती कोरोना महामारी रोखू शकत नाही असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. तसेच 'लस आल्यानंतर ती करोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल.'
5 / 14
'कोरोनाची लस आल्यानंतर ज्याचा आता वापर केला जात आहे ती सर्व सिस्टम रिप्लेस करेल असं होणार नाही' असं देखील म्हटलं आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीच्या सप्लाय चेनबाबतही माहिती दिली आहे.
6 / 14
कोरोनाची लस तयार झाल्यास सुरुवातीला ती हेल्थ वर्कर्सला दिली जाईल. त्यानंतर लोकांची प्रायोरिटी ठरवून त्यांना देण्यात येईल. लस आल्यानंतर मृतांच्या संख्येत घट होईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
7 / 14
कोरोनावरील लस आल्यानंतर सावध राहणं गरजेचं असल्याचं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. कोरोनाची चाचणी करणं, लक्षणं आढळल्यास स्वत: ला आयसोलेट करणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 14
टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं होतं. आल्याने मी सेल्फ क्वारंटाईन केलं आहे अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली होती.
9 / 14
'मी एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व माझ्यामध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाईनमध्ये असणार आहे व घरूनच काम करणार आहे' असं टेड्रोस यांनी म्हटलं होतं.
10 / 14
'आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. असं केले तरच आपण कोरोना संसर्गाची ही साखळी तोडू शकतो व कोरोनावर मात करू शकतो. तसेच आरोग्य प्रणालीचे रक्षणही करू शकणार आहोत' असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
11 / 14
मॉडर्ना कंपनीनं दिलासादायक माहिती दिली आहे. मॉडर्ना कंपनीनं तयार केलेली कोरोनावरील लस 94.5 टक्के यशस्वी ठरली आहे. मॉडर्ना कंपनीची लस तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यातील सुरुवातीचे निष्कर्ष हाती आले आहेत.
12 / 14
कोरोनावरील लस 94.5 टक्के यशस्वी ठरल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. गेल्या आठवड्यात फायझरनं कोरोनावरील लस 90 टक्के प्रभावी ठरल्याचं जाहीर केलं होतं.
13 / 14
मॉडर्ना कंपनी त्यानंतर आता 94.5 टक्के प्रभावी ठरली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्या अमेरिकन आहेत. बहुतांश लसी तिसऱ्या टप्प्यात सुरुवातीला 50 ते 60 टक्के प्रभावी ठरतात. मात्र फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लसींचे निष्कर्ष अपेक्षेपेक्षा अधिक चांगले आहेत.
14 / 14
कोरोना लसीचं वितरण सुरू करण्यापूर्वी अधिक माहिती उपलब्ध होणं गरजेचं आहे. कोरोना लसीच्या सुरक्षेशी संबंधित अधिक माहिती मिळाल्यानंतरच नियामकांकडून लसींना मंजुरी मिळते. नियामकांनी लवकर परवानगी दिल्यास डिसेंबरपासून अमेरिकेत दोन्ही लसींचा आपत्कालीन वापर सुरू होईल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना