शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : चिमुकल्यांना मास्क लावणं गरजेचं आहे की नाही?, WHO ने जारी केले नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 11:22 AM

1 / 16
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 30 लाखांहून अधिक झाली असून आतापर्यंत 55 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 16
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगसह मास्क वापरण्याचा सल्ला जगभरातील तज्ज्ञ देत आहेत. अनेक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
3 / 16
काही देशांमध्ये मास्क वापरणं अनिवार्य असून न घातल्यास हजारो रुपयांचा दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
4 / 16
सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही तिथे मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. असं असताना आरोग्य तज्ज्ञांनी मात्र पालकांना लहान मुलांना मास्क घालण्यासंबंधी सल्ला दिला आहे.
5 / 16
जागतिक आरोग्य संघटनेने चिमुकल्यांच्या मास्कबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. WHO च्या नव्या सूचनांनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही प्रौढांसारखे मास्क घालणे महत्त्वाचे आहे.
6 / 16
संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने मास्क घालण्यासाठी जगभरात जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लागू आहेत असं म्हटलं आहे.
7 / 16
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना मोठ्यांप्रमाणे कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे मास्क महत्त्वाचा आहे.
8 / 16
जेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही अशा ठिकाणी किंवा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालावेअसं देखील म्हटलं आहे.
9 / 16
WHOच्या मते 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले प्रौढांप्रमाणे कोरोना पसरवू शकतात. तर 5 वर्षांखालील मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही असं देखील सांगितलं आहे.
10 / 16
पाच वर्षांखालील मुलांना कोरोनाचा धोका कमी आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना मास्क घालणे बंधनकारक नाही असं देखील WHOने स्पष्ट केले आहे.
11 / 16
6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांनी मास्कचा वापर करावा. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालणे गरजेचा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
12 / 16
काही दिवसांपूर्वी दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्क धोकादायक ठरू शकतं असं जपानच्या आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं होतं. जपान पीडियाट्रिक असोसिएनशनने पालकांना सावध केलं होतं.
13 / 16
दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालू नका, त्यांना समस्या उद्भवू शकतात अशी सूचना जपान पीडियाट्रिक असोसिएनशनने पालकांसाठी जारी केली होती.
14 / 16
2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणं बंद करा. लहान मुलांचा एअर पॅसेज लहान असतो. मास्क घातल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो असं त्यांनी म्हटलं होतं.
15 / 16
मास्कमुळे मुलांच्या हृदयावर ताण येऊ शकतोस, तसेच हिट स्ट्रोकचा धोकाही वाढू शकतो, अशी सूचना या पालकांना देण्यात आल्या आहेत.
16 / 16
कोरोना व्हायरसची गंभीर प्रकरणं ही चिमुकल्यांमध्ये अगदी कमी आहेत. बहुतेक लहान मुलांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडूनच कोरोनाची लागण झालेली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या