1 / 15देशात चौथ्या लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने 31 मे रोजी लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढविण्याची घोषणा होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. 2 / 15पहिल्या तीन लॉकडाऊनच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या बरीच आटोक्यात होती. त्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले होते आणि स्वयंशिस्त पाळल्याबद्दल देशवासीयांचे आभारही मानले होते. 3 / 15चौथ्या लॉकडाऊनच्या काळात मात्र रुग्णसंख्या खूपच वाढली आणि ती आता दीड लाखांवर गेली आहे. त्यातच लाखो स्थलांतरित मजूर मोठ्या शहरांतून आपापल्या गावी जात आहेत.4 / 15अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यापासून संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढविला जाईल, असे दिसत आहे.याच दरम्यान सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे यासारखे खबरदारीचे उपाय केले जात आहेत. 5 / 15लॉकडाऊननंतर आता अत्यावश्यक सेवा देणारे किराणा, अॅग्रो, मेडीकल, खासगी दवाखाने, दूध, भाजीपाला विक्रची दुकाने सुरू आहेत. 6 / 15कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील काही दुकानदारांनी सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू केली आहे. 7 / 15कोरोनाविषयी काही दुकानदार गंभीर असल्याचे चित्र एकीकडे दिसत असतानाच अद्यापही बहुतांश दुकानात सोशल डिस्टंसिंकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 8 / 15देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. लोक गर्दी करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा अनेक ठिकाणी फज्जा उडाल्याचं चित्र आहे. याच दरम्यान सोशल डिस्टंसिंग संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 9 / 15कोरोना व्हायरस संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी 6 फूटाचं अंतर ठेवणं हे पूरेसं नसल्याची माहिती एका रिसर्चमधून आता मिळत आहे.10 / 15जीवघेणा कोरोना व्हायरस शिंकल्या वा खोकल्यानंतर तब्बल 20 फूट अंतरावर जाऊ शकतो. वैज्ञानिकांनी विविध वातावरणातील स्थितीत खोकणे, शिंकणे आणि श्वास सोडताना नाकातून येणाऱ्या संक्रमणाच्या थेंबांच्या प्रसाराचा मॉडेल तयार केला आहे.11 / 15मॉडेलनुसार कोरोना व्हायरस सर्दी आणि थंड वातावरणात तीन पटीने जास्त पसरू शकतो. या संशोधनात अमेरिकेतील सांता बारबरास्थित कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांचाही समावेश आहे. 12 / 15संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार शिंकणे आणि खोकल्यादरम्यान तोंड आणि नाकावाटे निघणारे थेंब विषाणू 20 फुटाच्या अंतरापर्यंत जाऊ शकतो. 13 / 15कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी 6 फूटाचे सोशल डिस्टंन्सिंग नियम पुरेसा नाही. त्यातही सर्दी असणाऱ्यांना आणि थंडीच्या वातावरणात हा धोका अधिक वाढतो.14 / 156 फूटाचे सोशल डिस्टंन्सिंग ऐवजी 20 फुटाचे अंतर असणं गरजेचं असल्याची माहिती या नव्या रिसर्चमधून समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.15 / 15मोठ्या शहरांत आणि त्यातही झोपडपट्ट्या, चाळी आणि दाट वस्ती असलेल्या भागांमध्येच कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळे मोठ्या शहरांवरच पाचव्या लॉकडाउनमध्ये अधिक लक्ष केंद्रित केले जाऊ शकेल. या झोपडपट्ट्या, चाळी आणि दाट वस्त्यांमध्ये कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला जाईल.