By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 18:12 IST
1 / 8संपूर्ण जग कोरोनाचा महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 238,100,144 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 4,859,599 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 8जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेकांनी कोरोनावर मात केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. जगभरात उपचारानंतर 215,241,393 जण कोरोनातून बरे झाले आहेत. 3 / 8कोरोनामुळे ब्राझीलमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या परिस्थिती बदलत असली तरी धोका मात्र अद्याप कायम असल्याचं चित्र समोर आलं आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 4 / 8तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढवली असून यामुळेच कोरोनाच्या आणखी एका लाटेचा धोका आहे. सध्या ब्राझीलमध्ये दररोज सरासरी 500 हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. एप्रिलमध्ये हा आकडा 300 होता.5 / 8देशातील 45 टक्क्यांहून अधिक लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. तर वयोवृद्ध लोकांना बुस्टर डोस देण्यात येत आहेत. ऑनलाईन रिसर्च साइट आवर वर्ल्ड इन डेटानुसार, अमेरिका आणि जर्मनीच्या तुलनेत ब्राझीलमध्ये सर्वाधिक लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.6 / 8कोरोना मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वात जास्त मृत्यू हे अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेतील सात लाख 32 हजार लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर दुसरा नंबर ब्राझीलचा लागतो. सहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 7 / 8तिसऱ्या नंबरवर भारत आहे. भारतामध्ये आता पर्यंत कोरोनामुळे साडे चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चौथ्या नंबरवर मेक्सिको आणि रशियाचा नंबर लागतो. कोरोनाचा वेग मंदावत अससा तरी मृतांच्या आकड्याने चिंता वाढवली आहे. 8 / 8कोरोनापुढे अनेक प्रगत देश हतबल झाले आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.