CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! अमेरिकेत रुग्णसंख्या तब्बल 6 कोटींवर; 8 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 16:30 IST
1 / 14कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. 2 / 14कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 30 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 308,004,231 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5,507,346 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 3 / 14कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. 4 / 14अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला असून जवळपास आठ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटसह ओमायक्रॉनचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत मृतांचा आकडा झपाट्याने वाढला आहे.5 / 14अमेरिकेला कोरोनाचा मोठा फटका बसलेला असतानाच आता ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचाही कहर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत तब्बल 6 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 6 / 14जागतिक कोरोना रुग्णसंख्येच्या जवळपास 20 टक्के रुग्ण हे फक्त अमेरिकेतील आहेत. अमेरिका हा जगातील कोरोना व्हायरसने सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.7 / 14कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या प्रकारामुळे संपूर्ण जगाला एका नव्या लाटेचा सामना करावा लागत आहे. सोमवारपर्यंत अमेरिकेत 6 कोटींहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 8 / 14युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनीअरिंग (CSSE) ने सोमवारी सकाळी आपल्या नवीन अपडेटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 60,072,321 वर पोहोचली आहे.9 / 14कोरोना मृतांची संख्या 837,594 वर पोहोचली आहे. तर अमेरिकेत 516,880,436 लोकांना लस मिळाली आहे. अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी 15 टक्क्यांहून अधिक लोक फक्त या देशात आहेत.10 / 149 नोव्हेंबर 2020 रोजी देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 1 कोटींवर पोहोचली होती. 1 जानेवारी 2021 रोजी 2 कोटींचा आकडा पार केला, तर 24 मार्च रोजी 3 कोटी, 6 सप्टेंबर रोजी 4 कोटी आणि 13 डिसेंबर रोजी 5 कोटींहून अधिक होता.11 / 14जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानुसार, अमेरिकेमध्ये आता दररोज 70,000 हून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 12 / 14अमेरिकेत चिमुकल्यांवर आता ओमायक्रॉन अटॅक करत असल्याची माहिती समोर आली आहे. 5 वर्षांखालील मुलांना याचा सर्वाधिक धोका असून त्यांच्यावर वाईट परिणाम होत आहे. अमेरिकेत ओमायक्रॉनचे थैमान पाहायला मिळत आहे.13 / 14लहान मुलांना या नव्या व्हेरिएंटची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. व्हाईट हाऊसकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांमध्ये लहान मुलांचं प्रमाण हे अधिक आहे.14 / 14न्यूयॉर्कमध्ये 18 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांचं रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण हे चार पटीने वाढलं आहे. अमेरिकेच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या मुलांपैकी 50 टक्के मुलं ही पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत.