CoronaVirus Live Updates : बापरे! जगभरात गेल्या 62 दिवसांत 10 कोटी लोकांना कोरोनाची लागण; आतापर्यंत 62 लाख रुग्णांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 09:45 IST
1 / 12कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 12कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. (फोटो - हिंदी न्यूज 18))3 / 12वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,209,664 लोकांचा बळी गेला आहे. तर 501,164,774 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहेत. अमेरिकेसारखा प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाला आहे. 4 / 1217 नोव्हेंबर 2019 रोजी चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर, पुढील 222 दिवसांत म्हणजेच 25 जून 2020 पर्यंत जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 1 कोटीवर पोहोचली. 5 / 12पहिल्या रुग्णापासून ते 10 कोटी रूग्ण होण्यासाठी फक्त 214 दिवस लागले. यानंतर, संसर्गाचा वेग इतका वाढला की अवघ्या 190 दिवसांत जगभरातील रुग्णांची संख्या तब्बल 20 कोटींवर पोहोचली.6 / 12कोरोनाने अमेरिकेत सर्वाधिक थैमान घातले आहे. आतापर्यंत 8.20 कोटी लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यात चांगली बाब म्हणजे 7.99 कोटी लोक बरेही झाले. पण 10 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला.7 / 12सर्वाधिक संसर्गाच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत येथे 4.30 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4.25 कोटी लोक बरे झाले आहेत, तर 5.21 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 8 / 12भारतात फक्त 11 हजार लोक संक्रमित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देखील शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 9 / 12जगभरात आता दररोज 6 ते 10 लाख लोकांना संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. तर 1500 ते 3 हजार मृत्यू होत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दररोज 6 ते 7 लाख लोक संसर्गातून बरे होत आहेत.10 / 12पण चिंतेची बाब आहे की, असे 10 देश आहेत जिथे कोरोनाच्या चौथ्या लाटेनं दार ठोठावलं आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रशिया, इटली, फ्रान्स, जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे.11 / 12गेल्या सात दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक 14 लाख रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, येथे 2100 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाची चिंता वाढली आहे. 12 / 12सात दिवसांत जर्मनीमध्ये 10 लाख आणि फ्रान्समध्ये 9 लाख लोकांना संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. चिमुकल्यांना संसर्ग होत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.