शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : मास्क नाही वापरला तर जाल जेलमध्ये, 'या' देशाने काढला कठोर कायदा 

By पूनम अपराज | Published: October 24, 2020 8:14 PM

1 / 6
जर लोक मास्क घालण्यास नकार देत असतील तर त्यांना या देशात 2 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा दिली जाईल. असा कठोर कायदा राबविणार्‍या देशाचे नाव इथिओपिया आहे. त्यासोबतच नवीन कायद्यात मास्क न घालता दंड आकारण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
2 / 6
इथिओपिया आफ्रिकेतील दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या देशआहे. एप्रिलमध्ये कोरोना रोखण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली. सप्टेंबरमध्ये आणीबाणी हटविण्यात आली होती, परंतु कठोर प्रतिबंध अद्याप लागू आहेत.
3 / 6
इथिओपियात आता लागू असलेल्या कडक नियमांनुसार तीनपेक्षा जास्त लोकांना टेबलावर बसण्याची मुभा नाही आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक आहे. सरकार म्हणते की, लोक सावध नाहीत आणि कोरोना नसल्यासारखे जगत आहेत. आरोग्यमंत्री  लिआ टेडेज म्हणतात की, लोक सतर्क राहिले नाहीत तर हा आजार वाढेल आणि यामुळे देशालाही धोका निर्माण होऊ शकतो.  
4 / 6

5 / 6
अधिकृत आकडेवारीनुसार, आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाचे ९१ हजार रुग्ण आढळले आहेत आणि जवळपास १४०० लोक मरण पावले आहेत. तथापि, माध्यमांच्या अहवालांमध्ये असे म्हटले जात आहे की, चाचणी अभावी वास्तविक डेटा माहिती मिळवणे कठीण आहे.
6 / 6
यावर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या प्रादेशिक आणि संसदीय निवडणुकाही इथिओपियाने पुढे ढकलल्या. आता पुढच्या वर्षी निवडणुका होणार असल्याची माहिती मिळत आहे. इथिओपियाची लोकसंख्या ११ कोटी ५८ हजार इतकी आहे आणि आफ्रिकेतीळ सर्वाधिक लोकसंख्या केवळ नायजेरियात २० कोटी ७६ हजार इतकी आहे. 
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंग