शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: हर्ड इम्युनिटीचा अट्टाहास धोक्याचा, ठरू शकतो असंख्य मृत्यूंचे कारण, डॉक्टरांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 10:19 PM

1 / 6
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी दररोज विविध उपायांबाबत चर्चा होत आहे. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी हर्ड इम्युनिटीबाबत तज्ज्ञांकडून चर्चा सुरू आहे. मात्र अमेरिकेतील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी हर्ड इम्युनिटीबाबत प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.
2 / 6
डॉ. अँथनी फाऊची यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेला आजार संपवण्यासाठी जर हर्ड इम्युनिटीचा अवलंब केला गेला तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतील. जर प्रत्येक जण कोरोवामुळे संक्रमित झाला तर अशा परिस्थितीत लक्षणे न दिसताही आजारी पडतील. त्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्य होईल.
3 / 6
आधीपासूनच कुठल्याही आजाराशी झुंजत असलेल्या लोकांसाठी कोरोना विषाणू अत्यंत धोकादायक ठरू शकतो. लठ्ठपणा, हायपरटेंशन किवा डायबिटिस यासारख्या आजारांशी झुंजत असलेल्या लोकांसाठी कोरोना अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे हर्ड इम्युनिटी मिळवणे अधिक धोकादायक होऊ शकते.
4 / 6
मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्ग झाल्यास विषाणूचा फैलाव रोखला जाऊ शकतो, अशा परिस्थितीत हर्ड इम्युनिटी मिळवता येऊ शकते. हर्ड इम्युनिटीचे दोन प्रकार आहेत. एकामध्ये लोकांना लस देऊन हर्ड इम्युनिटी विकसित केली जाते. तर दुसऱ्या प्रकारात लोक आपोआप संक्रमित होऊन बरे होतात.
5 / 6
दरम्यान, कोरोनाच्या बाबतीत हर्ड इम्युनिटीसाठी ६० ते ७० टक्के लोकसंख्येला संसर्ग होणे आवश्यक आहे. यापूर्वी कोरोनामुळे बरे झालेले लोक किती दिवस कोरोनापासून सुरक्षित राहू शकतात, याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती.
6 / 6
तर जेएचबी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. डेव्हिड डॉडी यांनी सांगितले होते की, कोरोनाविरोधातील नैसर्गित इम्युनिटी तीन ते सहा महिन्यांपर्यंतच टिकू शकते. त्यामुळे आपण हर्ड इम्युनिटीबाबत न बोललेलेच बरे, असे सांगितले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्यUnited Statesअमेरिका