शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर मारला 'लकवा', डोळा बंद करताना होतोय त्रास; 'या' देशात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 9:30 AM

1 / 13
महाभयंकर कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत.
2 / 13
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 18 कोटींवर पोहोचली आहे. लाखो लोकांचा कोरोनाने आतापर्यंत बळी घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्य़ाने चिंता वाढली आहे.
3 / 13
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय हे केले जात आहेत. कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती ही सातत्याने समोर येत आहे. याच दरम्यान काही ठिकाणी कोरोना लसीचे साईड इफेक्ट देखील समोर आले आहेत.
4 / 13
कोरोनाची लस घेतल्यानंतर काही लोकांना त्रास जाणवू लागला आहे. ताप येणं, स्नायूंमध्ये वेदना, लस घेतलेल्या भागाला सूज आणि वेदना, अशक्तपणा अशी लक्षणं दिसू लागतात. तर काहींना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
5 / 13
कोरोना लसीच्या साईड इफेक्टची एक गंभीर घटना आता समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एका व्यक्तीला अर्धांगवायूचा झटका आला आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
6 / 13
ब्रिटनमधील एका 61 वर्षीय व्यक्तीने कोरोनावरील फायझरची (Pfizer Vaccine) लस घेतली होती. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांची तब्येत थोडी बिघडत होती. मात्र दुसऱ्या डोसनंतर प्रकृती अचानक आणखी खालावली आहे.
7 / 13
61 वर्षांच्या या व्यक्तीने फायझरची कोरोना लस (Pfizer Vaccine) घेतली होती. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले. पहिला डोस घेतल्यानंतरच त्याची तब्येत बिघडू लागली होती. दुसरा डोस घेतल्यानंतर त्याची तब्येत आणखी खराब झाली. त्याला लकवा मारला.
8 / 13
द सनच्या रिपोर्टनुसार ब्रिटिस मेडिकल जर्नलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की, फायझरची लस घेतल्यानंतर या व्यक्तीची प्रकृती आणखी बिघडली. लसीचा डोस घेतल्यानंतर चेहऱ्याच्या एका भागाला लकवा मारला आणि एक डोळाही पूर्णपणे बंद होत नाही आहे.
9 / 13
रुग्णावर सध्य़ा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीला बेल्स पाल्सी (Bell’s Palsy) झाल्याचं निदान झालं आहे. यामध्ये चेहऱ्यावर परिणाम होतो.
10 / 13
बेल्स पाल्सीवर उपचार केले जातात. मात्र यामध्ये 9 महिन्यांत लोक पूर्णत: बरे होतात. तर कधी कधी त्यापेक्षा जास्त कालावधी देखील लागू शकतो. कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा अधिक धोका आहे.
11 / 13
रिपोर्टनुसार, फायझरच्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पाच तासांत रुग्णाच्या चेहऱ्याच्या एका बाजुला लकवा मारला. काही दिवस त्याच्यावर उपचार केल्यानंतर ते ठीक झाले. सर्व चाचण्या करण्यात आल्या त्या देखील उत्तम होत्या.
12 / 13
रुग्णाने यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला तेव्हा चेहऱ्याच्या दुसऱ्या बाजुला लकवा मारला आणि एक डोळा बंद करण्यास देखील त्रास होऊ लागला. यावेळी परिस्थिती आणखी गंभीर झाली. मात्र आता उपचार सुरू आहेत.
13 / 13
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर