शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine : चीनची कोरोना लस जगात सर्वात असुरक्षित, तब्बल 73 साईड इफेक्ट्स; डॉक्टरनेच केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 5:31 PM

1 / 10
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल आठ कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 88,603,013 वर पोहोचली आहे. तसेच कोरोनामुळे तब्बल 1,908,747 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 10
कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान चीनमधीलच शास्त्रज्ञ आणि डॉक्टरने चीनी सरकारची आता पोलखोल केली आहे. चीनची कोरोना लस जगातील सर्वात असुरक्षित लस असल्याचं समोर आलं आहे.
3 / 10
चीनमधील एका डॉक्टरने कोरोना लसीबाबत धक्कादायक दावा केला आहे. डॉक्टर ताओ लिना (Tao Lina) यांनी 'चीनमध्ये तयार झालेली साइनोफार्माची कोरोना लस (Sinopharm COVID-19 vaccine) जगातील सर्वात असुरक्षित लस आहे' असं म्हटलं आहे.
4 / 10
'कोरोना लसीमुळे 73 पेक्षाही जास्त साईड इफेक्ट होण्याची शक्यता आले. या लसीचं ट्रायल पूर्ण झालं नाही आणि याचे धक्कादायक दुष्परिणाम आहेत' असं देखील चीनमधील डॉक्टरांनी म्हटलं आहे.
5 / 10
डॉ. ताओ यांनी कोरोना लसीबाबत ब्लॉग लिहिला आहे. हा ब्लॉग चीनी सोशल मीडिया साईट वीबोवर अपलोड केला होता. त्यांचा हा लेखही आता हटवण्यात आला आहे आणि त्याचं कारणही दिलेलं नाही.
6 / 10
ताओ यांनी पोस्टमध्ये चीनी लसीचं इंजेक्शन घेताच डोकेदुखी, वेदना, हाय ब्लड प्रेशर, डोळ्यांनी नीट न दिसणं, तोडांची चव जाणं, वारंवार लघवी होणं असे 73 दुष्परिणाम होऊ शकतात असं म्हटलं आहे.
7 / 10
डॉ. ताओ यांनी चीनी सरकारच्या दबावामुळे आपलं विधान आता मागे घेतलं आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ताओ यांनी आरोप केला आहे मीडिया त्यांच्या वाक्यांचा वेगळा अर्थ काढतं आहे.
8 / 10
कोरोना लसीबाबत चिंता आहे पण ती गंभीर नाही. चीनी उपचार खूप सुरक्षित आहेत असं म्हटलं आहे. तसेच केलेल्या विधानाबाबत माफीही मागितली आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना साइनोफॉर्म लसीला सशर्त मंजूरी दिली होती.
9 / 10
कोरोना लस 79.34 टक्के प्रभावी असल्याचा दावा चीननं केला आहे. चीनीन नववर्षाच्या आधी म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही लस दिली जाईल. आरोग्य कर्मचाऱ्यांचं सर्वात आधी लसीकरण केलं जाणार आहे.
10 / 10
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. हुबेई प्रांतात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनCorona vaccineकोरोनाची लसdoctorडॉक्टर