शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:25 IST

1 / 15
Big Prediction On America And Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतासाठी डोकेदुखी ठरत आहेत. एकीकडे ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर दुसरीकडे व्हिसा नियमात बदल केले. याचा फटका हजारो भारतीयांना तसेच अमेरिकेतील अनेक कंपन्यांना बसू शकतो, असे म्हटले जात आहे. टॅरिफच्या मुद्द्यावरून सातत्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असलेल्या भारताला आता व्हिसाच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाचाही विचार करावा लागणार आहे.
2 / 15
तसेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपण थांबवले, असा दावाही सातत्याने डोनाल्ड ट्रम्प करताना पाहायला मिळत आहे. भारताने ट्रम्प यांचे दावे फेटाळले असले तरी विविध जागतिक मंचावरून ट्रम आपले घोडे पुढे दामटवताना दिसत आहेत. हा सगळा खटाटोप शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळावा, यासाठी केला जात असल्याचे म्हटले जात आहे.
3 / 15
असे असले तरी ट्रम्प यांच्या निर्णयांना अमेरिकेतूनच विरोध होत असताना दिसत आहे. अमेरिकेतील अनेक नेते, सिनेट सदस्य, आजी-माजी अधिकारी भारताच्या बाजूने बोलत असून, ट्रम्प यांना वास्तवाची जाणीव करून देत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष ठरू शकतात. संयुक्त अमेरिकेचे तुकडे होऊ शकतात, हे सगळे पुढील दोन वर्षांत घडू शकते, असे मोठे भाकित केले गेले आहे.
4 / 15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुंडलीबद्दल बोलायचे झाले तर, सार्वजनिक डोमेनकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी सकाळी १०:५४ वाजता न्यू यॉर्कमधील जमैका येथे झाला. डोनाल्ड ट्रम्प यांची रास वृश्चिक आहे. डोनाल्ड ट्रम्प कधीही त्यांच्या शब्दावर कायम राहत नाहीत.
5 / 15
डोनाल्ड ट्रम्प यांची लग्न रास मिथुन असून, मंगळ स्थित आहे. पहिले स्थान व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करते. यातील मंगळ व्यक्तीला धैर्यवान, उत्साही आणि आत्मविश्वासू बनवतो. तथापि, अशा व्यक्तींमध्ये राग, आक्रमकता आणि संघर्षाची प्रवृत्ती असते. त्यांच्यात संयम नसतो आणि त्यांना दबाव आवडत नाही, जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसून येते. भारतावरील कर वाढवण्याचा निर्णय याच प्रवृत्तीचा परिणाम आहे.
6 / 15
ग्रहांच्या संकेतांवरून स्पष्टपणे दिसून येते की, ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट, यामुळे भारतासाठी नवीन व्यवसाय संधी खुल्या होतील आणि देश आणखी मजबूत होईल. ट्रम्प यांच्या कुंडलीत सध्या विरोध आणि संघर्षाची शक्यता प्रबळ आहे. भविष्यात त्यांना राजकीय दबाव आणि टीकेचा सामना करावा लागेल हे निश्चित आहे, असे दावे काही ज्योतिषांकडून केले जात आहेत.
7 / 15
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष असतील. कारण अमेरिका आता संयुक्त संघ राहणार नाही. जसे रशियाचे तुकडे झाले, तसेच अमेरिकेचेही आता तुकडे होतील. संयुक्त असलेल्या अमेरिकेतली दोन ते तीन देश वेगळी होतील. ५० पैकी काही देश वेगळी भूमिका घेऊन वेगळी चूल मांडतील. जुलै २०२७ च्या पूर्वी हे होईल, असे भाकित केले गेले आहे. सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.
8 / 15
जुलै २०२७ च्या पूर्वी पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचा समावेश करतील. भारत स्थायी सदस्य होईल आणि व्हिटो पॉवर भारताला मिळेल. आताच्या घडीला या परिषदेत स्थायी सदस्य असलेल्या देशांची संख्या ५ आहे. भारत त्यात समाविष्ट होईल, असे भाकित करण्यात आले आहे.
9 / 15
तसेच ट्रम्पच्या कुंडलीत दुसऱ्या स्थानी गुरु वक्री आहे, जे दर्शवते की, ट्रम्पचे आर्थिक निर्णय अनेकदा वाद निर्माण करतील. आपली संपत्ती आणि व्यवसाय वाढवण्यासाठी कठोर आणि एकतर्फी धोरणे अवलंबण्यावर विश्वास ठेवतात.
10 / 15
चौथ्या स्थानी चंद्र आणि केतु असून, ही स्थिती अस्थिर आणि हट्टीपणा दर्शवते. असे लोक सहसा स्वतःच्या अटींचे पालन करतात आणि तडजोड टाळतात. म्हणूनच ट्रम्प भारतासारख्या देशांसोबतही उदारता दाखवण्यास कचरतात. दहाव्या स्थानी सूर्य आणि राहुची युती मोठी महत्वाकांक्षा आणि शक्ती प्रदान करते.
11 / 15
तथापि, राहु प्रभावामुळे कधीकधी ही महत्वाकांक्षा अति स्वार्थी बनू शकते. म्हणूनच ट्रम्प यांनी सातत्याने अमेरिकेच्या हितांना प्राधान्य दिले आहे आणि इतर देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.
12 / 15
ट्रम्पच्या कुंडलीत बुध ग्रह ११ व्या स्थानी आहे. याचा अर्थ ट्रम्पसाठी नफा मिळवणे, नवीन संबंध निर्माण करणे आणि रणनीतीद्वारे पैसे कमवणे सोपे आहे.
13 / 15
ट्रम्प यांच्या बाराव्या स्थानी शनि आणि शुक्र विराजमान आहेत. या स्थानी असलेले हे दोन्ही ग्रह एकत्रितपणे सूचित करतात की, ट्रम्प परदेशी गुंतवणूक आणि मालमत्तेत पारंगत आहेत, परंतु वैयक्तिक जीवनात किंवा मानसिक शांततेत आव्हानांना तोंड देतात.
14 / 15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, एकंदरीत कुंडली आणि ग्रहांची दशा पाहता, ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणे, अत्यंत कठीण आहे. नोबेल पुरस्कार जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना खूप संघर्ष करावा लागू शकतो.
15 / 15
- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUnited StatesअमेरिकाAstrologyफलज्योतिषIndiaभारतIndiaभारतNobel Prizeनोबेल पुरस्कार