शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:41 IST

1 / 9
बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांनी 2026 संदर्भात केलेली भाकितं सध्या सोशल मेडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. लहाणपणापासून नेत्रहीन जन्मलेल्या बल्गेरियन महिला बाबा वेंगा यांनी अनेक भाकितं खरी ठरल्याचे बोलले जाते.
2 / 9
जसे की, 9/11 दहशतवादी हल्ला, सोव्हिएत संघाचा ऱ्हास, अमेरिकेत बराक ओबामा यांचा विजय आदी... तर जाणून घेऊयात २०२६ साठी काय संकेत देते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
3 / 9
तिसरं महायुद्ध - वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, जगाच्या पूर्वेकडील भागात भू-राजकीय तणाव वाढून, मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकते. यु युद्धाची झळ अगदी पाश्चात्य देशांपर्यंतही पोहोचू शकतात. यामुळे तेथेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक शक्तीचे संतुलानही बिघडू शकते आणि एक मुख्य रशियन नेता यावर नियंत्रण ठेवू शकतो.
4 / 9
नैसर्गिक आपत्ती - जगाला 2026 मध्ये, पर्यावरण संकट, हवामान बदल, पुराचीसमस्या, दुष्काळ, भूकंप आदी प्राकृतिक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो. असे संकेतही बाबा वेंगा यांनी दिले आहेत.
5 / 9
मानवी नियंत्रणाबाहेरील जाईल AI? - बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीनुसार, AI ची शक्ती एवढी वाढेल की, ते मानवि नियंत्राणाबाहेर जाणून निर्णय घेण्यास सुरुवात करेल. या परिणाम केवळ उद्योगांवरच नाही, तर मानवी दिनचर्येवरही होईल. यामुळे मोठे आव्हाण उभे राहू शकते.
6 / 9
आशियाची ताकद वाढणार - बाबा वेंगा यांच्या भाकितातून, आशियाई खंडातील एखादा देश शक्तिशाली देश म्हणून उदयाला येण्याचे संकेत मिळतात. अर्थात २०२६ मध्ये आशिया खंडातील एखाद्या देशाचा प्रभाव वाढू शकतो. याशिवाय, या भागात तणावाचे वातावरणही राहू शकते.
7 / 9
रशियात नव्या नेत्याचा प्रवाभ वाढणार - वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, रशियामध्ये एखाद्या नव्या नेत्याचा प्रभाव वाढू शकतो. रशियातील एखादा शक्तीशाली नेता जगावर आपले वर्चस्व निर्माण करू शकतो. महत्वाचे म्हणजे, युद्ध आणि राजकीय उलथा-पालथीत, या नेत्याला लक्षणीय मान्यता मिळू शकते.
8 / 9
कोण होत्या बाबा वेंगा? - बाबा वेंगा यांचे पूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोव्हा होते. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९११ रोजी झाला. असे म्हटले जाते की, लहानपणी एका भीषण वादळात सापडल्यामुळे त्यांची दृष्टी गेली. मात्र, दृष्टी गेल्यानंतर त्यांच्यात 'भविष्य पाहण्याची' एक अजब शक्ती निर्माण झाली, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. ११ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांचे निधन झाले.
9 / 9
कोण होत्या बाबा वेंगा? - बाबा वेंगा यांचे पूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोव्हा होते. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९११ रोजी झाला. असे म्हटले जाते की, लहानपणी एका भीषण वादळात सापडल्यामुळे त्यांची दृष्टी गेली. मात्र, दृष्टी गेल्यानंतर त्यांच्यात 'भविष्य पाहण्याची' एक अजब शक्ती निर्माण झाली, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. ११ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांचे निधन झाले.
टॅग्स :warयुद्धrussiaरशियाEarthquakeभूकंपchinaचीन