फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:00 IST
1 / 10पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला पराभूत केल्याचा खोटा बनाव करत मुनीरला प्रमोशन मिळाले, त्याशिवाय आता पुढील १० वर्ष पाकिस्तानी नेतृत्वासोबत मिळून देशावर राज्य करण्याचं प्लॅनिंग करत असल्याचे पुढे आले आहे.2 / 10असीम मुनीरचा कार्यकाळ वाढवण्याची तयारी सुरू आहे. अलीकडेच पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या फार्महाऊसवर एका बंद खोलीत सीक्रेट बैठक झाली. ज्यात पंतप्रधान शहबाज शरीफ, नवाज शरीफ, पंजाबचे मुख्यमंत्री मरियम आणि असीम मुनीर यांचा सहभाग होता.3 / 10या बैठकीत पुढील १० वर्षाची रणनीती आखून त्याला अंतिम स्वरुप देण्यावर चर्चा झाली. ज्यात सध्याची व्यवस्था निरंतर ठेवणे, दिर्घकालीन राजनैतिक आणि आर्थिक स्थिरता यावर फोकस करण्यात आले. मुनीर पाकिस्तानी नेतृत्वासोबत मिळून पुढील १० वर्ष राज्य करण्याची तयारी करत आहे. 4 / 10बैठकीत सहभागी असलेल्या सर्वांनी १० वर्षांच्या व्यवस्थेच्या योजनेवर सहमती दर्शवली आहे. अमेरिका, चीन आणि आखाती देशांसारख्या देशांमध्ये परकीय गुंतवणुकीसाठी स्थिर राजकीय आणि सुरक्षित वातावरण प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे असं 'CNN-News18' ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. 5 / 10२०२२ मध्ये तीन वर्षांसाठी नियुक्त झालेल्या मुनीर यांना आता पाकिस्तान आर्मी अॅक्ट १९५२ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार आणखी पाच वर्षांची मुदतवाढ दिली जाऊ शकते असा अंदाज लावला जात आहे. मुनीर यांचा कार्यकाळ २८ नोव्हेंबर २०२५ रोजी संपत आहे आणि आता लवकरच पुनर्नियुक्तीची औपचारिक अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. 6 / 10या बैठकीत पाकिस्तानच्या नागरी-लष्करी प्रशासनाची चौकट निश्चित करण्यात आली, जिथे उच्च लष्करी नियुक्त्यांसह सर्व प्रमुख निर्णय राजकीय आणि लष्करी नेतृत्वाच्या सहमतीने घेतले जातील.7 / 10पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेतील आयएसआयमधील डीजी, डीजी मिलिटरी इंटेलिजेंस आणि डीजी-सी (काउंटर-इंटेलिजेंस) सारखी पदे दोघांच्याही संमतीने भरली जातील. 8 / 10आयएसआयचे डीजी लेफ्टनंट जनरल असीम मलिक देखील या बैठकीत उपस्थित होते. ते ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांना सेवेचा विस्तार देण्यासाठीही चर्चा सुरू आहे.9 / 10पाकिस्तानच्या उच्च नेतृत्वाची ही बैठक यासाठीही महत्त्वाची ठरते कारण त्यात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही चर्चा झाली. इम्रान खान बराच काळ तुरुंगात आहेत आणि असीम मुनीर आणि शरीफ कुटुंबाशी त्यांचे वैर खूप जुने आहे. 10 / 10सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तानी जनतेने इम्रानच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात मतदान केले, परंतु शाहबाज शरीफ यांच्या पक्षाला कसं तरी सत्ता काबीज करण्यात यश आले. इम्रान खान यांना कोणत्याही प्रकारची सवलत किंवा दिलासा दिला जाणार नाही असं या बैठकीत स्पष्टपणे सांगण्यात आले .